शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

विवाहितेने डास मारण्याचे औषध पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2021 15:06 IST

तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

ठळक मुद्देवारंवार फोन करुन दिला जाणारा त्रास आणि संसार उद्धवस्त करण्याच्या धमकीने महिलेने निवडला होता आत्महत्येचा मार्ग

पुणे: तुझा संसार उद्धवस्त् करुन फोटो व्हायरल करेल अशी धमकी देऊन पती व सासुच्या मोबाईलवर फोन करुन त्रास देणार्‍यांच्या छळाला कंटाळून एका विवाहितेने डास मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी लोणीकंद पोलिसांनी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. 

वैभव दत्तात्रय धस, दत्तात्रय धस, आणि नितीन धस (सर्व रा. जि़ बीड) अशी गुन्हा दाखल केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी वाघोलीमधील एका २५ वर्षाच्या विवाहितेने फिर्याद दिली आहे.  फिर्यादी व वैभव धस हे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. वैभव याने फिर्यादीला वारंवार फोन करुन अश्लील भाषेत बोलून संबंध ठेव, कॉल उचल, असे बोलून मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले. त्याची या विवाहितेने तक्रार दिली होती.

त्यावर फिर्यादीने तक्रार मागे घ्यावी म्हणून तिच्या भावाला जीवे मारण्यासाठी गुंड पाठविले होते. तसेच फिर्यादी यांना तुझा संसार उद्धवस्त् करुन टाकील, तुझे फोटो व्हायरल करेल, अशी धमकी दिली. तसेच तिचे पती व सासु यांना मोबाईलवर फोन करुन त्यांनाही त्रास दिला. हा प्रकार ११ मार्च पासून २१ मेपर्यंत सुरु होता. या सततच्या छळाला कंटाळून फिर्यादीने घरातील डास मारण्याचे औषध पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यावर उपचार करण्यात आल्यानंतर त्यांनी फिर्याद दिली असून महिला पोलीस उपनिरीक्षक पवार अधिक तपास करीत आहेत. 

टॅग्स :PuneपुणेPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारीArrestअटक