विवाहितेची चिमुकलीसह रेल्वेखाली आत्महत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 16, 2020 04:27 IST2020-12-16T04:27:58+5:302020-12-16T04:27:58+5:30

लोणी काळभोर : येथील पुणे - दौंड रेल्वे मार्गावर एका विवाह‌ितेने आपल्या ९ महिण्यांच्या चिमुकल्या मुलीसह रेल्वेखाली आत्महत्या केल्याची ...

Married woman commits suicide under train with Chimukali | विवाहितेची चिमुकलीसह रेल्वेखाली आत्महत्या

विवाहितेची चिमुकलीसह रेल्वेखाली आत्महत्या

लोणी काळभोर : येथील पुणे - दौंड रेल्वे मार्गावर एका विवाह‌ितेने आपल्या ९ महिण्यांच्या चिमुकल्या मुलीसह रेल्वेखाली आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना मंगळवारी घडली.

शितल देवराम मखवाने (वय २७) आणि शुभ्रा (वय ९ महिने. दोघी रा. वारजे माळवाडी, रामनगर, पुणे) अशी आत्महत्या केलेल्या मायलेकींची नावे आहेत. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप अस्पष्ट आहे. याप्रकरणी शितलचे मामा विजय रामचंद्र सांळुके (वय ४२, रा. सर्वे क्रमांक १३१, शिंदेवस्ती, हडपसर) यांनी दिलेल्या फिर्यादी दिली.

शितल यांचा विवाह १५ वर्षापुर्वी झालेला असून त्यांना ४ मुली आहेत. गेल्या ९ महिन्यांपासून त्या व मुलगी शुभ्रा या आजीकडे लोणी काळभोर येथे राहत होत्या. सोमवारी (दि. १४) रात्री ९.३०च्या सुमारास लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील रामा कृषी रसायन लिमिटेड या खतनिर्मिती करत असलेल्या कंपनीजवळ पुणे - दौंड रेल्वे मार्गावर शितल व शुभ्रा या दोघींचे मृतदेह आढळले. याची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी पोहोचले व त्यांंची ओळख पटल्यानंतर अकस्मात मृत्यूूूची नोंद करून दोघींचेही मृतदेह उत्तरीय तपासणी साठी ससून हॉस्पिटल पुणे येथे पाठवण्यात आले.

Web Title: Married woman commits suicide under train with Chimukali