विवाहितेला रॉकेल ओतून पेटविले
By Admin | Updated: November 12, 2014 23:05 IST2014-11-12T23:05:00+5:302014-11-12T23:05:00+5:30
लिमटेक (ता. बारामती) येथील विवाहितेला रॉकेल ओतून पेटवून दिल्याचा प्रकार सोमवारी (दि. 1क् नोव्हेंबर) सायंकाळी घडला.

विवाहितेला रॉकेल ओतून पेटविले
बारामती : लिमटेक (ता. बारामती) येथील विवाहितेला रॉकेल ओतून पेटवून दिल्याचा प्रकार सोमवारी (दि. 1क् नोव्हेंबर) सायंकाळी घडला. या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्यानुसार पतीसह सासू, सास:यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी पतीला अटक करण्यात आली आहे.
पोलीस सूत्रंनी दिलेल्या माहितीनुसार, लिमटेक येथील विवाहिता अमृता अरूण काटे (वय 2क्) या विवाहितेने पोलिसांकडे फिर्याद दिली आहे. त्यानुसार पती अरूण बाळासो काटे, सासरा बाळासो काटे, सासू सुशिला काटे (तिघे रा. लिमटेक) या तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 1क् नोव्हेंबर रोजी सायंकाळी अमृता ही गोठा झाडत होती. यावेळी पती अरूण याने तिला दगड मारला. मला तुझी गरज नाही, मला दुसरे लग्न करायचे आहे, असे म्हणून आरोपींनी संगनमताने फिर्यादी अमृता हिस शिवीगाळ केली. तसेच, पतीने तिला अंगावर रॉकेल ओतून पेटवून देऊन जिवे मारण्याचा प्रयत्न केला. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक एम. ए. खान करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणी पती अरुण काटे यास अटक करण्यात आली आहे. सोमवारी (दि. 1क् नोव्हेंबर) याबाबत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोलीस उपनिरीक्षक एम. ए. खान करीत आहेत. (वार्ताहर)