रॉकेल ओतून विवाहितेला पेटविले

By Admin | Updated: October 23, 2016 03:46 IST2016-10-23T03:46:27+5:302016-10-23T03:46:27+5:30

सासरच्या मंडळींनी विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची घटना निगडी येथे घडली. या घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या विवाहितेचा उपचारा वेळी मृत्यू झाला

Married to a kerosene | रॉकेल ओतून विवाहितेला पेटविले

रॉकेल ओतून विवाहितेला पेटविले

पिंपरी : सासरच्या मंडळींनी विवाहितेच्या अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याची घटना निगडी येथे घडली. या घटनेत गंभीररीत्या भाजलेल्या विवाहितेचा उपचारा वेळी मृत्यू झाला असून, या प्रकरणी निगडी पोलिसांनी पतीसह आठ जणांवर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
रुबीना सगीर बागवान असे या घटनेत मृत्यू झालेल्या विवाहितेचे नाव आहे. या प्रकरणी रुबीना यांची आई मदिना ताहीरअली राईन (रा. खारघर, नवी मुंबई) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार रुबीना यांचा पती सगीर मुन्सीरजा बागवान, सासरा मुन्सीरजा बागवान, सासू नजबून मुन्सीरजा बागवान, नणंदावा रिजवान बागवान, नणंद शबनम बागवान, दीर मुन्ना बागवान, पप्पू बागवान, गुड्डु बागवान (सर्व रा. बोऱ्हाडे चाळ, ओटा स्कीम, निगडी) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
रुबीना बागवान यांचा पती सगीर बागवान हा रुबीना यांना मारहाण करीत असे. यासह सासू, सासरे, दीर, नणंद, नणंदावा हेदेखील रुबीना यांना किरकोळ कारणावरून मारहाण व शिवीगाळ करीत त्यांचा मानसिक छळ करीत होते. दरम्यान, १४ आॅक्टोबरला सकाळी नऊ वाजता राहत्या घरी पतीसह सासरच्या मंडळींनी रुबीना यांच्या अंगावर रॉकेल ओतून त्यांना पेटविले. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Married to a kerosene