विवाहित मुलीवर पित्याकडून बलात्कार
By Admin | Updated: July 5, 2014 06:12 IST2014-07-05T06:12:25+5:302014-07-05T06:12:25+5:30
सासरी होत असलेल्या छळाला कंटाळून माहेरी राहण्यास आलेल्या पोटच्या १९ वर्षीय विवाहित मुलीवर एक वर्षापासून बलात्कार करणाऱ्या ५२ वर्षीय नराधम पित्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे

विवाहित मुलीवर पित्याकडून बलात्कार
पुणे : सासरी होत असलेल्या छळाला कंटाळून माहेरी राहण्यास आलेल्या पोटच्या १९ वर्षीय विवाहित मुलीवर एक वर्षापासून बलात्कार करणाऱ्या ५२ वर्षीय नराधम पित्याविरुद्ध विश्रांतवाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी पीडित तरुणीने फिर्याद दिली आहे. पीडित तरुणीचे लग्न झाल्यानंतर तिचे सासूसासरे तिचा छळ करायला लागले. त्यामुळे ही तरुणी माहेरी राहायला आली. तिचे लहान भाऊ आणि बहीण घराबाहेर गेले की हा नराधम तिच्यावर बलात्कार करीत असे. लहान भाऊ व बहिणीला त्याने मारण्याची धमकी दिली होती. त्यामुळे तरुणी वडिलांचे अत्याचार सहन करीत होती. हा प्रकार असह्य झाल्यानंतर तिने पोलिसांची भेट घेऊन आपली करुण कहाणी सांगितली. हा प्रकार ऐकून सुन्न झालेल्या विश्रांतवाडी पोलिसांनी तातडीने या नराधमाच्या मुसक्या आवळल्या.