शहरं
Join us  
Trending Stories
1
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
4
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
5
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
6
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
7
इंडियन बँक, महिंद्राच्या NBFC वर आरबीआयची मोठी कारवाई; लावला कोट्यवधींचा दंड, कारण काय?
8
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
9
Tarot Card: लहान मुलांप्रमाणे क्षणार्धात राग सोडून द्या, आनंदात राहाल; वाचा टॅरो भविष्य!
10
अनंत अंबानींकडे रिलायन्स इंडस्ट्रिजच्या एक्झिक्युटिव्ह डायरेक्टरपदाची जबाबदारी, कधीपासून सांभाळणार पदभार?
11
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
12
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
13
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
14
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
15
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
16
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
17
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
18
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
19
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
20
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती

तिच्या इच्छेविरोधात लावले २७ वर्षांनी मोठ्या व्यक्तीशी लग्न, नातेवाईकांविरुद्ध गुन्हा दाखल 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 15:21 IST

नवरा मुलगा तुझ्या आई वडिलांना पुण्यात घर घेऊन देणार आहे. तसेच शिक्षक असल्याने कर्जही फेडणार आहे. तू लग्नास नकार देवू नको, असे एका व्यक्तीने सांगितले.

ठळक मुद्देतरुणीपेक्षा २७ वर्षांनी मोठ्या व्यक्तीसोबत जबरदस्तीने विवाह नवरा मुलगा पाहण्यास जायचे असे खोटे सांगितले.

पिंपरी : नवरा मुलगा पाहण्यास जायचे असे सांगून १९ वर्षीय तरुणीला उस्मानाबाद जिल्हयातील तेरखेड या गावी नेण्यात येते. तिथे तरुणीपेक्षा २७ वर्षांनी मोठ्या व्यक्तीसोबत तिचा जबरदस्तीने विवाह जमविण्यात आला. या प्रकरणी तरूणीने आई-वडिलांसह पंधरा जणांवर सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी दिप्ती गायकवाड (वय १९, रा. जुनी सांगवी) या तरुणीने सांगवी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आई अनिता गायकवाड (वय ३६), वडील दयानंद गायकवाड (वय ४६),  शामा मच्छिंद्र माने (वय ५४), मच्छिंद्र माने (वय ४६), रवी माने (वय २९) शामल रवी माने (वय २५ रा.पटेकर चाळ, ढोरगल्ली), रूपाली राहुल भांडळे (वय ३०), राहुल भांडळे (वय ३१,), उत्तम विठ्ठल काळे आणि इतर सहाजण अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी दिप्तीचे लग्न तिला न विचारता ठरवण्यात आले. ते तिला मान्य नव्हते. नवºया मुलालाही पाहिलेले नव्हते. तरीसुध्दा त्या व्यक्तीशी लग्न करण्यास तरुणीने नकार दिला. मात्र, नवरा मुलगा पाहण्यास जायचे असे खोटे सांगून दिप्ती यांना जबरदस्तीने गाडीत बसवुन उस्मानाबाद येथील तेरखेड गाव येथे नेण्यात आले. तिथे उत्तम विठ्ठल माने या ४६ वर्ष वयाच्या इसमाला नवरा मुलगा म्हणून पुढे आणले. 'नवरा मुलगा वडिलांपेक्षा मोठा दिसतो,त्याचे पहिले लग्न झाले आहे. त्यास चौदा वर्षांची मुलगी देखील आहे. त्यामुळे त्याच्याशी लग्न करणार नाही,' असे दिप्तीने आपल्या पालकांना सांगितले.त्यावेळी एका व्यक्तीने तो तुझ्या आई वडिलांना पुण्यात घर घेऊन देणार आहे.  तसेच शिक्षक असल्याने कर्जही फेडणार आहे. तू लग्नास नकार देवू नको, असे तिला धमकावले. नवरा मुलगा म्हणाला, मला मुलगा पाहिजे यासाठी तुझ्याबरोबर लग्न करणार आहे. २२ मार्च २०१८ रोजी दीप्ती यांना आळंदी येथे जबरदस्तीने नेऊन लग्न लावून दिले. २० एप्रिलला दीप्ती यांनी सांगवी पोलिसांना फोन करून याबाबत माहिती दिल्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. महिला पोलीस उपनिरीक्षक शिंदे याबाबत अधिक तपास करीत आहेत.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrimeगुन्हाmarriageलग्नWomenमहिलाPoliceपोलिस