विनयभंगामुळे विवाहितेची आत्महत्या

By Admin | Updated: January 25, 2017 02:12 IST2017-01-25T02:12:43+5:302017-01-25T02:12:43+5:30

सासरकडील नातेवाइकाने लगट करण्याच्या बहाण्याने जवळ येऊन विनयभंग केल्याच्या कारणावरून व सासरच्या मंडळींकडून

Marriage suicide due to molestation | विनयभंगामुळे विवाहितेची आत्महत्या

विनयभंगामुळे विवाहितेची आत्महत्या

पुणे : सासरकडील नातेवाइकाने लगट करण्याच्या बहाण्याने जवळ येऊन विनयभंग केल्याच्या कारणावरून व सासरच्या मंडळींकडून वारंवार होणाऱ्या जाचाला कंटाळून विवाहितेने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोथरुड येथील डहाणूकर कॉलनी येथे शुक्रवारी घडली. याप्रकरणी अलंकार पोलिसांनी पती, सासू
आणि नणंदेचा पती या तिघांना अटक केली आहे.
अर्चना ऊर्फ काजल विनोद ढवारे असे मृत्यू पावलेल्या महिलेचे नाव आहे. तर नणंदेचा पती हणुमंत सोनवणे , सासू सरस्वती ढवारे आणि पती विनोद राम ढवारे या तिघांना अलंकार पोलिसांनी अटक केली आहे.
याप्रकरणी अर्चनाची आई आशाबाई राजू आदमाने (वय ४६, रा़ वारजे) यांनी फिर्याद दिली आहे.
अर्चना उर्फ काजल ढवारे हिचे डिसेंबर २०१५मध्ये विनोद ढवारे याच्याशी लग्न झाले होते. विनोद ढवारे हा व्यवसायाने चालक आहे. तो डहाणूकर कॉलनीच्या लक्ष्मीनगर परिसरात राहण्यास आहे. तेथेच जवळ त्याची बहीण आणि तिचा पती हनुमंत सोनवणे राहतात. हनुमंत हादेखील व्यवसायाने चालक आहे. जवळच राहण्यास असल्याने त्याचे घरी येणे-जाणे असायचे.
मात्र लग्न झाल्यापासून काजलची सासू व पती विनोद दोघे तिला स्वयंपाक नीट येत नाही म्हणून टोचून बोलत तसेच तिला शेळ्या चारण्यासाठी जबरदस्तीने बाहेर पाठवत होते. तिला माहेरीदेखील पाठवत नव्हते. दरम्यान सोनवणे याचे घरी येणे जाणे असायचे.
तिच्याशी जवळीक साधण्याचा प्रयत्न करायचा. त्याने हा प्रकार वारंवार केला. काजलने हा प्रकार तिच्या पतीलाही सांगितला.
मात्र सोनवणे याने एके दिवशी तिच्याशी लगट करण्याचा प्रयत्न केला आणि तिचा विनयभंग केला. पती, सासू यांच्याकडून वारंवार होणारा त्रास आणि नणंदेच्या पतीने लगट करण्यासाठी केलेला विनयभंग या त्रासाला कंटाळून शेवटी तिने शुक्रवारी राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली.
(प्रतिनिधी)

Web Title: Marriage suicide due to molestation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.