विवाहितेची आत्महत्या
By Admin | Updated: February 29, 2016 00:53 IST2016-02-29T00:53:16+5:302016-02-29T00:53:16+5:30
वाल्हेकरवाडीत सुप्रिया गंगाधर कांबळे या उच्चशिक्षित विवाहितेने शनिवारी रात्री साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.

विवाहितेची आत्महत्या
चिंचवड : वाल्हेकरवाडीत सुप्रिया गंगाधर कांबळे या उच्चशिक्षित विवाहितेने शनिवारी रात्री साडीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. आत्महत्येचे कारण स्पष्ट झाले नाही.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, केरळी तरुण आशिष हरिकुरूप या आयटी अभियंत्याबरोबर दीड वर्षापूर्वी आळंदीत सुप्रियाचा प्रेमविवाह झाला होता. वाल्हेकरवाडीत ते दोघे राहत होते. शनिवारी रात्री आशिष चहा पिण्यासाठी बाहेर गेला. चहा पिऊन परत घरी आल्यानंतर त्याने दरवाजा ठोठावला. आतून प्रतिसाद मिळाला नाही. आजुबाजूच्या रहिवाशांच्या मदतीने दरवाजा उघडला असता, सुप्रिया साडीच्या साह्याने गळफास घेऊन लटकत असल्याचे दिसून आले. सुप्रियाने आत्महत्या केल्याची माहिती मिळताच बीडवरून तिचे आई, वडील पुण्यात आले. आत्महत्येच्या
घटना वाढल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)