लग्नाच्या आमिषाने विवाहितेवर बलात्कार
By Admin | Updated: January 9, 2015 23:21 IST2015-01-09T23:21:27+5:302015-01-09T23:21:27+5:30
लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर वारंवार बलात्कार करण्यात आला.

लग्नाच्या आमिषाने विवाहितेवर बलात्कार
मंचर : लग्नाचे आमिष दाखवून विवाहितेवर वारंवार बलात्कार करण्यात आला. विवाहितेने दिलेल्या तक्रारीवरून दीपक दशरथ थोरात (रा. चांडोली बुद्रूक) याच्या विरोधात मंचर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
मंचर पोलिसांनी दिलेली माहिती पुढीलप्रमाणे, चार वर्षांपूर्वी या महिलेचा विवाह झाला. लग्नानंतर एक वर्षाने चांडोली बुद्रूक येथे दीपक थोरात याच्याशी तिची ओळख झाली. त्यानंतर थोरात त्या विवाहितेला वारंवार फोन करु लागला. मेसेज पाठवू लागला. विवाहितेच्या पतीने मेसेज पाहिला, तेव्हापासून नवरा तिला नांदवत नव्हता. या महिलेला एक मुलगी आहे.
थोरात याने मी तुझ्याशी लग्न करतो तुला व तुझ्या मुलीला सुखात ठेवतो, असे आमिष दाखवून २२ मे २०१४ ला मुंबई, लुधियाना (पंजाब), उत्तराखंड, खारघर, तळोजा येथे बलात्कार केला.
दीपक थोरात याच्या आईने मदत केली. या विवाहितेला थोरात याने मारहाण व शिवीगाळ केली. तिने शुक्रवारी मंचर पोलिसात फिर्याद दिली. पोलिसांनी दीपक दशरथ थोरात याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. तपास सहायक पोलीस निरीक्षक ज्योती डमाले करीत आहे. (वार्ताहर)