वाल्हे येथील ग्रामदैवत भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा शांततेत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 04:16 IST2021-05-05T04:16:51+5:302021-05-05T04:16:51+5:30
यंदा कोरोनाच्या महामारीमुळे गावातील यात्रा रद्द झाली असली तरी देवाचे धार्मिक विधी मात्र पार पाडले. दरवर्षीप्रमाणे यंदाही एक तारखेला ...

वाल्हे येथील ग्रामदैवत भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचा विवाह सोहळा शांततेत
यंदा कोरोनाच्या महामारीमुळे गावातील यात्रा रद्द झाली असली तरी देवाचे धार्मिक विधी मात्र पार पाडले. दरवर्षीप्रमाणे यंदाही एक तारखेला देव देवळात गेले व दोन तारखेला देवाची हळद लागली आणि आज तीन तारखेला सायंकाळी साडेपाचच्या मुहुर्तावर श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचा लग्न सोहळा पार पडला.
पुजारी बाबा आगलावे व सचिन आगलावे यांच्या हस्ते सर्व विधी झाले. या पार्श्वभूमी वर आज श्री भैरवनाथ व माता जोगेश्वरी यांचा लग्न सोहळाही आनंदमय वातावारणात पार पडला. यावेळी मंदीर गाभारा फुलांनी सजविण्यात आला होता. लग्न सोहळ्याचे प्रक्षेपण सर्व भाविकांना पाहता यावे म्हणून युट्युब व फेसबुक आदी सोशलमिडीयावर थेट प्रेक्षपण करण्यात आले होते. त्यामुळे भाविकांनी घरी बसून अक्षदा टाकल्या. यावेळी नागरिकांनी मंदिर परिसरात गर्दी करु नये, यासाठी जेजुरी पोलीस ठाण्याचे प्रभारी सुनील महाडीक यांच्या मार्गदर्शनाखाली वाल्हे पोलिस चौकीचे हवलदार केशव जगताप, संतोष मदने, समीर हिरगुडे यांनी कडक बंदोबस्त ठेवला होता.
--
फोटो क्रमांक: ०३वाल्हे ग्रामदैवत भैरवनाथ -जोगेश्वरी विवाह सोहळा
फोटो : ग्रामदैवत भैरवनाथ आणि माता जोगेश्वरी यांच्या विवाह सोहळ्यासाठी दरवर्षी हजारो भाविकांची मंदिरात गर्दी असते मात्र यंदा विवाह सोहळ्याच्या वेळी मंदिर असे रिकामे होते.