पणन संचालक सुभाष माने निलंबित
By Admin | Updated: September 4, 2014 01:59 IST2014-09-04T01:59:38+5:302014-09-04T01:59:38+5:30
पणन विभागातील कोटय़वधी रुपयांचे गैरव्यवहार उघडकीस आणणारे पणन संचालक डॉ. सुभाष माने यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

पणन संचालक सुभाष माने निलंबित
पुणो : पणन विभागातील कोटय़वधी रुपयांचे गैरव्यवहार उघडकीस आणणारे पणन संचालक डॉ. सुभाष माने यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्यांची खातेनिहाय चौकशी देखील करण्यात येणार आहे. डॉ. माने यांनी उघडकीस आणलेल्या भ्रष्टाचाराच्या प्रकरणांमुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असल्याची चर्चा आहे.
‘माध्यमांच्या प्रतिनिधींना माहिती दिली,’ हे तसेच अन्य कारणो देत माने यांच्यावर ही कारवाई केल्याचे समजते. पणन विभागाचा कारभार काही वर्षे दुय्यम अधिका:यांकडून चालविण्यात येत होता. पात्रतेनुसार या पदावर आपलाच हक्क असल्याने महाराष्ट्र अॅडमिनिस्ट्रेटिव्ह ट्रिब्युनलकडे (मॅट) धाव घेतली. मॅटने देखील त्यांच्या बाजूनेच निकाल दिला होता.
पणन संचालक म्हणून पदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर त्यांच्या पूर्वीच्या अधिका:यांनी दाबून ठेवलेल्या गैरव्यवहारांच्या प्रकरणांवर त्यांनी कारवाई करण्यास सुरुवात केली. मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचार बाहेर काढला. त्यांच्या निर्णयाला सरकारने स्थगिती दिली. बीडमधील 3क्2 कोटींच्या उडीद गैरव्यवहार प्रकरणी माने यांनी दोषींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. पुणो प्रादेशिक बाजार समितीतील कामगार वसाहतीतील टीडीआर घोटाळा, पणन मंडळाच्या इमारतीवरील खचांचा देखील त्यांनी लेखाजोखा मागितला होता.(प्रतिनिधी)