शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमुळे ५२ दिवसांपासून बंद असलेली इंदापुर शहरातील बाजारपेठ मंगळवारी सुरु

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2020 20:37 IST

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर इंदापूर शहरात रुग्ण नसतानाही इंदापूरला रेड झोनमध्ये टाकण्यात आले होते.

ठळक मुद्देसोमवारी उशिराने काही अटींवर बाजारपेठ सुरु करण्यास दिली संमती. व्यापारी वर्गातुन बाजारपेठ सुरु करण्यात यावी अशी होत होती मागणी. 

इंदापूर (कळस) : गेली ५२ दिवसांपासून लाँकडाऊनमुळे बंद असलेली इंदापुरची शहरातील बाजारपेठ मंगळवारी सुरु करण्यात आली. बारामती प्रमाणेच रोटेशन पद्धतीने व्यवहार सुरू राहणार आहेत.  प्रांताधिकारी कार्यालयाने बाजारपेठ सुरु करण्यास परवानगी दिली असल्याची माहिती तहसिलदार सोनाली मेटकरी यांनी दिली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर इंदापूर शहरात रुग्ण नसतानाही इंदापूरला रेड झोन मध्ये टाकण्यात आले होते. त्यामुळे संपूर्ण अर्थकारण थांबले  होते. त्यामुळे बाजारपेठ सुरु करण्यात यावी अशी मागणी व्यापारी वर्गातुन होत होती. व्यापारी संघाचे अध्यक्ष नंदकुमार गुजर, मुकुंद शहा, भरत शहा,उपनगराध्यक्ष धनंजय पाटील, नरेंद्र गांधी सराफ, सराफ संघटनेचे  श्रीनिवास बानकर, यांनी तहसिलदार मेटकरी यांची भेट घेवून दुकाने सुरू करण्यास परवानगी देण्याची मागणी केली होती.  राज्यमंत्री दत्तात्रय भरणे, प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनाही विनंती करण्यात आली होती. त्यामुळे प्रांताधिकारी कांबळे यांनी सोमवारी उशिराने काही अटींवर बाजारपेठ सुरु करण्यास संमती दिली. याप्रमाणे नियोजन करण्यात आले आहे.  सोमवार व गुरुवार वाहनांचे सर्व्हिसिंग, संगणक, इलेक्ट्रॉनिक, रेडिमेड, फर्निचर, मोबाईल, फोटो स्टुडिओ, स्वीट होम, फुले व पुष्पहार दुकाने, मंगळवार व शुक्रवार कापड दुकाने, भांडी, शिलाई,फुटवेअर, सोन्याचांदीचे दुकाने,घड्याळे, सुटकेस व बॅगा, दोरी, पत्रावळी, बुधवार व शनिवार स्टेशनरी, कटलरी,स्टील, टायर्स, सायकल, हार्डवेअर, बिल्डिंग मटेरिअल, पेंट, झेरॉक्स, डिजिटल फ्लेक्स, प्रिंटिंग प्रेस, माती व भांड्यांची दुकाने, टोपल्या व बांबूची दुकाने सुरु ठेवण्याची परवानगी देण्यात आली आहे.

जीवनावश्यक सेवेतील किराणा माल, भाजीपाला, फळे, दूध, शेतीविषयक बी, बियाणे औषधे रविवार वगळून दररोज सुरू राहतील. मात्र , ठरलेल्या दिवशी सर्व दुकाने सकाळी ८ ते सांयकाळी ६ पर्यंतच चालु राहतील.मात्र, ही दुकाने सुरू करताना काही बंधने पाळावी लागणार आहेत. यात ग्राहकांनी मास्क वापरणे, ग्राहकांना सॅनिटायझर सुविधा देणे, थर्मामीटरचा वापर करणे, प्रत्येक कर्मचाऱ्यांनी मास्क  वापरणे, दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाचा नाव, पत्ता व मोबाईल क्रमांक लिहून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.

टॅग्स :Indapurइंदापूरbusinessव्यवसायCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस