‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त सजल्या बाजारपेठा

By Admin | Updated: February 13, 2017 02:16 IST2017-02-13T02:16:11+5:302017-02-13T02:16:11+5:30

वर्षभर तरुण ज्या दिवसाची वाट पाहत असतात, अशा व्हॅलेंटाईन डेनिमित्त पुण्यातील बाजारपेठा सजल्या आहेत. आपल्या आवडत्या व्यक्तीला

The market for decorated 'Valentine's Day' | ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त सजल्या बाजारपेठा

‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त सजल्या बाजारपेठा

पुणे : वर्षभर तरुण ज्या दिवसाची वाट पाहत असतात, अशा व्हॅलेंटाईन डेनिमित्त पुण्यातील बाजारपेठा सजल्या आहेत. आपल्या आवडत्या व्यक्तीला देण्यासाठी विविध गिफ्ट्स घेण्यासाठी तरुणाईची पावले गिफ्ट्स शॉप्सकडे वळू लागली आहेत.
‘व्हॅलेंटाईन डे’ हा प्रेम व्यक्त करण्याचा दिवस म्हणून साजरा केला जातो. यासाठी आवडत्या व्यक्तीला आपल्या भावना गिफ्टच्या स्वरूपातून त्यांच्यापर्यंत पोहोचवल्या जातात. यासाठी बाजारपेठाही सज्ज झाल्या आहेत.
गुलाबी - लाल रंगाची प्रेमाचे संदेश असलेली ग्रीटिंग्ज तरुणांना भावत आहेत. नेहमीप्रमाणे यंदाही टेडी बेअरला तरुणांची पसंती दिसून येत आहे. विविध आकारांचे व रंगाचे टेडी बेअर बाजारात दाखल झाले आहेत. तरुणींच्या आवडीच्या चॉकलेट्समध्ये यंदा विविध प्रकार दाखल झाले आहेत. पूर्वीच्या काळी संदेश कापडावर लिहून पाठवला जात असे. अशाच प्रकारामध्ये प्रेमाचे संदेश कापडावर लिहिण्यात आले असून अशा वेगळ्या प्रकारचे गिफ्ट्स देऊन यंदाचा व्हॅलेंटार्ईन डे साजरा करण्यात येणार आहे.
गुलाबपुष्प देऊन प्रेम व्यक्त करण्याची पद्धत अजूनही कायम असून यासाठी लाल गुलाबांना मागणी वाढली आहे. गुलाबासोबतच मध्यभागी टेडी बेअर व सभोवताली गुलाबांचे आच्छादन असलेले गुलाबांचे गुच्छ तरुणांचे लक्ष वेधून घेत आहेत. १०० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंत किमतीचे गुच्छ बाजारात पाहायला मिळत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The market for decorated 'Valentine's Day'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.