आळेफाटा येथील संकरित गाईंचा बाजार पुन्हा भरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 18, 2021 04:08 IST2021-06-18T04:08:13+5:302021-06-18T04:08:13+5:30

आळेफाटा : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजार आवारात दर गुरुवारी भरणारा संकरित गाईंचा बाजार लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर ...

The market for crossbred cows at Alleppey was replenished | आळेफाटा येथील संकरित गाईंचा बाजार पुन्हा भरला

आळेफाटा येथील संकरित गाईंचा बाजार पुन्हा भरला

आळेफाटा : जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजार आवारात दर गुरुवारी भरणारा संकरित गाईंचा बाजार लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर प्रथमच पुन्हा सुरू झाला. गुरुवारी (दि. १७) भरलेल्या बाजारात संकरित गाईंची चांगल्या प्रमाणात आवक झाली. जवळपास १८० संकरित गाई येथे विक्रीस आल्या. तर १२० गाईंची प्रतवारीप्रमाणे प्रत्येकी ३० ते ६५ हजार रुपयांपर्यत विक्री झाली असल्याचे सभापती संजय काळे, सचिव रूपेश कवडे यांनी सांगितले.

कोरोना संसर्गजन्य आजाराचा प्रादुर्भाव वाढल्याने करण्यात आलेल्या लाॅकडाऊनमुळे दोन महिन्यांपेक्षा अधिक काळ आळेफाटा उपबाजारात गुरुवारी भरणारा संकरित गाईंचा बाजारही बंद होता. शासनाने लाॅकडाऊन शिथिल केल्यानंतर गुरुवारी (दि. १७) पुन्हा कोरोना नियमांचे पालन करत संकरित गाईंचा बाजार भरला.

आळेफाटा येथील उपबाजार आवारात १९९६ सालापासून दर गुरुवारी हा संकरित गाईंचा बाजार भरत आहे. चांगल्या प्रतीच्या संकरित गाई येथे विक्रीस येतात. तेजी-मंदीचा सामना करत आजही हा संकरित गाईंचा उपबाजार टिकून आहे. शेतकरी तसेच व्यापारी येथे गाई विक्रीस आणतात. दुग्ध व्यवसायाला चालना देणारा आळेफाटा येथील उपबाजार असल्याने पुणे तसेच अहमदनगर, ठाणे, नाशिक औरंगाबाद या जिल्ह्यांतील शेतकरी व व्यापारी नेहमी येथे गाई खरेदी-विक्री करण्यासाठी येतात. लाॅकडाऊन शिथिल झाल्यानंतर आज गुरुवारी भरलेल्या या बाजारात चांगली आर्थिक उलाढाल झाली.

पावसाळा सुरू झाल्याने चारा व पाणीटंचाईचा प्रश्न मार्गी लागणार असल्याने शेतकरीवर्गाकडून गाईंचे खरेदीस चांगला प्रतिसाद मिळाला. जवळपास १८० संकरित गाई येथे विक्रीस आल्या, तर १२० गाईंची प्रतवारीप्रमाणे प्रत्येकी ३० ते ६५ हजार रुपयांपर्यत विक्री झाली असल्याचे सभापती संजय काळे, सचिव रूपेश कवडे यांनी सांगितले.

चौकट : दुधाला असलेल्या कमी दरामुळे शेतकरीवर्गाचे गाई खरेदीचे प्रमाण सरासरी असल्याचे व्यापारी रूपेश कुऱ्हाडे, अमोल कुऱ्हाडे व किरण कुऱ्हाडे यांनी सांगितले.

चौकट : लाॅकडाऊनमुळे गाईंचा बाजार बंद होता. मात्र, पुन्हा हा बाजार सुरू झाल्याने योग्य प्रतीच्या गाई खरेदी करण्यास येथे आल्याचे पिंपरी पेंढार येथील दत्तू शेलार व वडगाव आनंद मोरदरा येथील भानुदास मोरे या शेतकऱ्यांनी सांगितले.

फोटो : आळेफाटा येथील भरलेला गुरुवारचा संकरित गाईंचा आठवडे बाजार.

Web Title: The market for crossbred cows at Alleppey was replenished

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.