शहरं
Join us  
Trending Stories
1
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
2
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
3
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
4
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
5
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
6
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
7
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
8
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश
9
उन्हाचा कहर; सातारा ४०.७ अंशावर स्थिर! झळा असह्य, पूर्व भागात नागरिकांना घामाच्या धारा 
10
अवघ्या १२०० रुपयांत दिली पतीला अद्दल घडविण्याची सुपारी! पत्नीनेच रचला पतीला लुटण्याचा 'प्लॅन'
11
सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दिशेने जातिनिहाय जनगणनेचा निर्णय महत्त्वाचा: अजित पवार
12
वेळ वाया घालवू नका, थेट कारवाई करा; पहलगाम हल्याबाबत राहुल गांधींची सरकारला मागणी
13
केवळ अजित पवारच नव्हे, शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडूनही मोदी सरकारच्या निर्णयाचं स्वागत
14
जातनिहाय जनगणना; अमित शाह म्हणाले ऐतिहासिक निर्णय, ओवेसी म्हणाले भाजपनं दलित मुस्लिमांसाठी...'
15
“सर्वच प्रश्न सुटतील, योग्य न्याय मिळेल”; जातिनिहाय जनगणना निर्णयाचे छगन भुजबळांकडून स्वागत
16
पुढच्या हंगामात खेळणार का? MS धोनीनं प्रश्न विचारणाऱ्या डॅनी मॉरिसनचीच घेतली फिरकी (VIDEO)
17
"CSKला धोनीची गरज नाही, संघाच्या भविष्यासाठी..."; MSD ज्याला आदर्श मानतो, त्यानेच मांडलं रोखठोक मत
18
दुकानदाराच्या डोळ्यात मिरची पूड टाकून ५० हजार रुपये लुटले, संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यात कैद!
19
केंद्र सरकारने अचानक जातीय जनगणनेचा निर्णय का घेतला? काँग्रेसचा सवाल...
20
गुरुवारी विनायक चतुर्थी: ५ मिनिटे लागतील, स्वामी-बाप्पा कृपा करतील; ‘हे’ मंत्र-श्लोक म्हणाच

बाजार समितीवर लोकनियुक्त संचालक मंडळ नेमावा - धनंजय चौैधरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 28, 2018 23:33 IST

सर्व कायदे व नियम धाब्यावर बसवून पुण्यातील गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या पंधरा वर्षांपासून प्रशासक व प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात येत आहे.

लोणी काळभोर : सर्व कायदे व नियम धाब्यावर बसवून पुण्यातील गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीवर गेल्या पंधरा वर्षांपासून प्रशासक व प्रशासकीय मंडळ नियुक्त करण्यात येत आहे. लोकनियुक्त संचालक मंडळ नेमण्याची वेळ येऊ नये व आपल्या कार्यकर्त्यांना संचालक मंडळात स्थान देता यावे, म्हणून आता बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा देण्याचे राज्य सरकारने ठरवले आहे, अशी टीका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते धनंजय चौधरी यांनी केली आहे.

धनंजय चौधरी म्हणाले, की सन २००३ मध्ये तत्कालीन जिल्हा उपनिबंधक शैलेश कोथमिरे यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक मंडळ बरखास्त केले होते. त्यानंतर आजपर्यंत बाजार समितीचा कारभार प्रशासक किंवा प्रशासकीय मंडळाने पाहिला आहे. महाराष्ट्र कृषी उत्पादन खरेदी-विक्री नियमन १९६३ या कायद्यानुसार जास्तीत जास्त फक्त एक वर्ष प्रशासक ठेवता येतो. परंतु तत्कालीन आघाडी व आताच्या युती सरकारने हा नियमच बासनात गुंडाळून ठेवला आहे. एवढी प्रचंड संपत्ती असलेल्या बाजार समितीच्याबाबतीत राज्य सरकारचे धोरण कायम धरसोडीचे राहिले आहे. कधी हवेली तालुक्याची बाजार समिती पुणे जिल्ह्याची होते, परत कधी ती हवेली तालुक्याची होते. फक्त निवडणूक टाळण्यासाठी हे प्रकार केले जातात. प्रत्येक वेळी कायद्यातील वेगवेगळ्या तरतुदींचा आधार घेऊन व आपल्याला पाहिजे तसा तरतुदीचा केल्या जातात. शेतकरी व बाजार समितीचे हित कशात आहे, याकडे कायमच दुर्लक्ष केले जाते.या संदर्भात सन २००४ मध्ये उपोषणही केले होते. त्यावेळी मिळालेल्या आश्वासनानुसार जिल्हा उपनिबंधकांकडे एक खटला सुरू आहे.चौधरी म्हणाले, की सध्या बाजार समितीला राष्ट्रीय दर्जा देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. या निर्णयामागेही राजकारण असल्याचा दाट संशय आहे. आयएएस अधिकाऱ्याच्या नेतृत्वाखाली आपल्या कार्यकर्त्यांना संचालक मंडळात स्थान द्यायचे, हा स्पष्ट हेतू या निर्णयामागे आहे.

परंतु राज्य सरकारने परिसरातील शेती, शेतकरी व शेतमालाची वाजवी दरात विक्री, बाजार समितीची संपत्ती आदी गोष्टींचा विचार करून या बाजार समितीवर लोकनियुक्त संचालक मंडळ नेमण्याचा निर्णय घ्यावा; अन्यथा न्यायालयीन मार्गाने लढा देण्याचा निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती धनंजय चौधरी यांनी दिली.प्रशासक राज्य मात्र सुरूचदि. १० जानेवारी २००८ ला हवेली तालुक्याची बाजार समिती जिल्ह्याची करण्यात आली, प्रशासक राज्य मात्र सुरूच राहिले. लोकशाही मार्गाने निवडून आलेल्या संचालक मंडळात शेतकरी, व्यापारी, हमाल या सर्व घटकांचे प्रतिनिधी असतात. या बाजार समितीच्या ताब्यात १७० एकर जमीन असून वार्षिक ३ हजार कोटीची उलाढाल आहे. बाजार समितीत सात हजार अधिकृत परवानाधारक व्यापारी असून बाजार समितीचा वार्षिक नफा ४० कोटी रुपये आहे. प्रामुख्याने शेतकºयांच्या शेतमालाला वाजवी भाव मिळावा, त्यांची आर्थिक पिळवणूक व फसवणूक होऊ नये, म्हणून कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे; परंतु गेल्या काही वर्षांत या मूळ हेतूलाच हरताळ फासण्याचे काम राज्य सरकार करीत आहे.

टॅग्स :PuneपुणेMarket Yardमार्केट यार्ड