आकाशदिव्यांच्या प्रकाशाने उजळली बाजारपेठ
By Admin | Updated: November 8, 2015 03:01 IST2015-11-08T03:01:21+5:302015-11-08T03:01:21+5:30
अंगणात लागणाऱ्या आकाशदिव्यांनी दिवाळीचा सण ओळखला जातो. शहरातील बाजारपेठ आकाशदिव्यांच्या प्रकाशाने उजळली आहे. यंदा आकाशकंदिलाच्या बाजारपेठेत चायनाचे

आकाशदिव्यांच्या प्रकाशाने उजळली बाजारपेठ
बारामती : अंगणात लागणाऱ्या आकाशदिव्यांनी दिवाळीचा सण ओळखला जातो. शहरातील बाजारपेठ आकाशदिव्यांच्या प्रकाशाने उजळली आहे. यंदा आकाशकंदिलाच्या बाजारपेठेत चायनाचे वर्चस्व जाणवत आहे. याशिवाय बाजारपेठेत बांबूंच्या चटईचे आकाशकंदील विशेष आकर्षण ठरले आहेत.
प्लॅस्टिकच्या रंगीबेरंगी कागदांची असणारी चांदणी केव्हाच हद्दपार झाली आहे. बांबूंच्या काड्या आणि प्लॅस्टिकच्या रंगीत कागदामध्ये केली जाणारी ही चांदणी दिवाळीत अंगणामध्ये आसमंत उजळत असे. आता या चांदणीची जागा हंडी, कलाकुसरीचे आकाशकंदील, कापडी आकाशकंदील यांनी घेतली आहे. बाजारात पन्नास रुपयांपासून एक हजार रुपयांपर्यंत आकाशकंदील विक्रीला उपलब्ध आहेत. हंडी, डबल हंडी, कमळ, अष्टकोनी आकाशकंदिलांसह शंभरहून अधिक प्रकारचे आकाशकंदील बाजारात विक्रीला उपलब्ध आहेत. कापडी आकाशकंदील, बांबूचे आकाशकंदील यंदा ग्राहकांमध्ये आकर्षण ठरले आहेत.
८०० रुपयांपर्यंत हे आकाशकंदील आहेत. दिवाळी संपल्यानंतर, हे आकाशकंदील घडी घालून जपून ठेवता येतात. त्यामुळे त्यांना अधिक मागणी असल्याचे विक्रेते अमोल तापकिरे यांनी सांगितले.