शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

कोलकत्यातील ज्युनिअर डॉक्टरांच्या हल्ल्याच्या निषेधार्थ मार्डचा एकदिवसीय संप

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 14, 2019 20:49 IST

डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील मार्डच्या डॉक्टरांनी शुक्रवारी संपाचे शस्त्र उगारले.

ठळक मुद्देकोलकत्यामध्ये एनआरएस वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणआय. एम. ए. पुणे शाखेच्या सर्व सभासदांनी काळ्या फिती लावून निषेध

पुणे : कोलकत्यामध्ये एनआरएस वैद्यकीय महाविद्यालयातील डॉक्टरांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातील मार्डच्या डॉक्टरांनी शुक्रवारी संपाचे शस्त्र उगारले.सकाळी आठ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत  तातडीची वैद्यकीय सेवा वगळता बाहयरुग्ण विभाग आणि वॉर्डमधील सेवा बंद ठेवण्यात आल्या.     कोलकत्यामधील एन आर एस वैद्यकीय महाविद्यालयातील डॉ.परिबाहा मुखर्जी  व यश टेकवानी या कार्यरत ज्युनिअर डॉक्टरांवर रूग्णाच्या नातेवाईकांनी हल्ला चढवला.  सध्या ते मृत्यूशी झगडत आहेत. कोलकात्यातील घटनेचे पडसाद संपूर्ण देशभरातील वैद्यकीय क्षेत्रात उमटले आहेत. या मारहारणीच्या निषेधार्थ पुण्यातील बीजे वैद्यकीय महाविद्यालय आणि रूग्णालयातील मार्डच्या डॉक्टरांनी संप पुकारला. सकाळी साडेदहा वाजता बीजे वैद्यकीय महाविद्यालयाच्या आवारात जमून मार्डच्या डॉक्टरांनी कोलकत्याच्या घटनेचा निषेधही केला. यासंदर्भात ‘लोकमत’ शी बोलताना बीजे मार्डचे सचिव डॉ. अभिषेक जैन म्हणाले, निवासी डॉक्टर हे 16 ते 24 तास रूग्णसेवेचे काम करतात. तरीही आम्ही हे का सहन करायचं? सरकारने डॉक्टरांच्या सुरक्षिततेसाठी कायदा मंजूर करावा आणि डॉक्टर व रूग्णालयाला चोवीस तास सुरक्षा द्यावी तरच अशा गोष्टींना वचक बसेल.     इंडियन मेडिकल अससोसिएशनच्या देशव्यापी निषेध दिनानिमित्त आय. एम. ए. पुणे शाखेच्या सर्व सभासदांनी काळ्या फिती लावून कलकत्ता येथील डॉक्टरांवरील  हल्ल्याचा निषेध केला. शहरातील सर्व वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आय. एम. ए. च्या मेडिकल स्टुडंट नेटवर्कने मार्ड सोबत जोरदार निदर्शने केली. आय. एम. ए. च्या पदाधिका-यांनी व सभासदांनी जिल्हाधिकारी कार्यालय येथे धरणे आंदोलन केले व नंतर निवासी उपजिल्हाधिकारी डॉ. जयश्री कटारे यांना निवेदन दिले.  याप्रसंगी आय. एम. ए. अध्यक्ष डॉ. संजय पाटील, ट्रस्ट बोर्ड चेअरमन डॉ. अविनाश भुतकर ,डॉ. पद्मा अय्यर, डॉ. आरती निमकर, डॉ. बी. एल. देशमुख, डॉ. मीनाक्षी देशपांडे,  डॉ. राजू वरयानी, डॉ. राजन संचेती व डॉ. आशुतोष जपे उपस्थित होते. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी व गृहमंत्री अमित शहा यांना ई-मेल द्वारे निवेदन देण्यात आल्याचे सांगण्यात आले. 

टॅग्स :Puneपुणेdoctorडॉक्टरhospitalहॉस्पिटलwest bengalपश्चिम बंगाल