शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णोदेवी भूस्खलनात आतापर्यंत ३० मृत्युची नोंद; बचावकार्य सुरू, मृतांची संख्या वाढण्याची शक्यता
2
अंतरवाली सराटीतून आज मराठा बांधव मुंबईकडे, गावा-गावात स्वागताची जय्यत तयारी
3
KCL 2025: पदार्पणाच्या सामन्यात हॅटट्रिक, भारताच्या युवा गोलंदाजाचा केसीएलमध्ये धुमाकूळ!
4
"एवढे शुल्क लाऊ की तुमचं...!"; पंतप्रधान मोदींसोबतच्या फोन कॉलसंदर्भात ट्रम्प यांचा मोठा दावा!
5
Vasai: वसईत चार मजली इमारतीचा भाग कोसळला; दोघांचा मृत्यू, ९ जण जखमी!
6
Amravati: पॉर्न व्हिडिओ पाहण्यापासून रोखल्याने मुलांचा वडिलांवर हल्ला, अमरावतीतील घटना!
7
भारताचे ‘सुदर्शन चक्र’ होणार ढाल अन् तलवारही, भारताचे आत्मनिर्भर होण्याच्या दृष्टीने आणखी एक पाऊल
8
खासगी शिकवणीकडे वाढला विद्यार्थ्यांचा ओढा, शालेय शिक्षणावर केंद्र सरकारने केलेल्या सर्वेक्षणातील निष्कर्ष
9
आजचे राशीभविष्य : बुधवार २७ ऑगस्ट २०२५; उत्पन्नापेक्षा खर्च वाढेल, आरोग्याकडे लक्ष द्यावे लागेल
10
भारत-पाकिस्तानसह ७ युद्धे मी थांबवली; ट्रम्प यांचा पुन्हा दावा
11
एका पक्षकाराला सकाळी, दुसऱ्याला दुपारी बोलावले अन् प्रकरण निकाली! राज्य माहिती आयोगाचा असाही कारभार
12
मेट्रो ४साठी फ्रान्समधील कंपनी बनविणार ३९ ड्रायव्हरलेस ट्रेनसेट
13
पंकज भोयर वर्धेबरोबरच भंडाऱ्याचेही पालकमंत्री, सावकारे यांची बुलढाण्याचे सहपालकमंत्रीपदी नियुक्ती
14
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
15
मिरारोडमध्ये सदनिकेचा स्लॅब पडून ४ वर्षाच्या बालकाचा मृत्यू; तिघे जखमी 
16
वेगवेगळ्या विचारसरणी असणे हा गुन्हा नाही : सरसंघचालक मोहन भागवत यांचं मत
17
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
18
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
19
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
20
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान

" मराठी " कधीच मरणार नाही : नोहा मस्सील 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2019 13:17 IST

आजी-आजोबांच्या माध्यमातून मातृभाषा पुढच्या पिढीपर्यंत नक्कीच पोहोचविली जाईल. ते मराठी मरू देणार नाहीत

ठळक मुद्देनोहा मस्सील यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने ‘भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार

पुणे : ’मराठी’ कधीच मरणार नाही. आजी-आजोबांच्या माध्यमातून मातृभाषा पुढच्या पिढीपर्यंत नक्कीच पोहोचविली जाईल. ते मराठी मरू देणार नाहीत असा विश्वास भारतीय बेने इस्त्राइल समाजाचे आघाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते आणि साहित्यिक नोहा मस्सील यांनी व्यक्त केला.गेली चाळीस वर्षे इस्त्राइल मध्ये  ‘मायबोली’ मासिकाच्या माध्यमातून सातासमुद्रापार मराठीची पताका यशस्वीपणे फडकविणाऱ्या नोहा मस्सील यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या वतीने ‘भीमराव कुलकर्णी कार्यकर्ता पुरस्कार देऊन  गौरविण्यात आले. त्यानिमित्त नोहा मस्सील यांच्याशी पत्रकारांनी संवाद साधला. नोहा मस्सील यांनी भारतीय बेने इस्त्राइल समाजाचा इतिहास यावेळी कथन केला. ते म्हणाले, रोमन सरदाराने हल्ला करून जेरूसलेम जिंकले. ज्यूंची मोठ्या प्रमाणावर कत्तल करण्यात आली. त्यातून जीव वाचवून असंख्य ज्यू देश सोडून वाट फुटेल तिकडे पळाले. काहींना व्यापार आणि दयावर्दी पेशामुळे भारत माहिती असल्यामुळे छोट्या मोठ्या गलबतात बसून ते भारताच्या दिशेने निघाले. मात्र वादळवा-यात अनेक गलबते फुटली. जे सुदैवाने बचावले ते अलिबाग किनाऱ्याजवळ अलिबाग जवळच्या चौल (नौगाव) बंदराजवळच्या किनाऱ्याला लागले. दुर्दैवी सहप्रवाशांचे मृतदेह कोकणवासियांनी धार्मिक कर्तव्य म्हणून हिंदू पद्धतीने दहन केले. आजही नौगाव येथील समुद्र किना-यावर ही ज्यू लोकांची जुनी एकत्रित दफनभूमी आहे. हे आलेले ज्यू स्वत:ला बायबलमधील परंपरेप्रमाणे  ‘बेने इस्त्राइल’ म्हणवून घेऊ लागले. माझा जन्म आणि बालपण भारतातच गेले. वयाच्या 24 व्या वर्षी मी पितृभूमीच्या आंतरिक ओढीने इस्त्राइलला स्थलांतरित झालो. भारत सोडताना पाय निघत नव्हता. ‘नव्हतो आलो आक्रमक म्हणूनी, नव्हतो, आलो व्यापारी बनूनी युद्धात आपला देश गमावूनी ,आलो होतो आश्रित म्हणूनी, अशी भावना मनात रूंजी घालत होती. दोन्ही संस्कृती वेगळ्या असल्याने सुरूवातीला काहीसे अवघड गेले. भारतीय ज्यू म्हणून वेगळं राहायचो पण देशाच्या विविध भागातून ज्यू लोक प्रस्थापित झाल्यामुळे सर्वजण एकत्रितपणे मिसळून गेलो. हिब्रू भाषा सगळ्यांना यायला हवी असा इस्त्राइलचा नियम आहे. आम्ही हिब्रूभाषेत प्रार्थना करायचो पण अर्थ काळायचा नाही. त्यासाठी सहा महिने ट्रेनिंग घ्यावे लागले. कामचलाऊ भाषा म्हणून शिकलो. तिथे सणांच्या माध्यमातून लोकांना राष्ट्रवादाचे धडे दिले जातात. हा देश ज्यूंच्या हातात असला तरी इस्त्राइल अरबांनाही सामावून घेतले आहे. देशाची लोकसंख्या अधिकाधिक वाढावी यासाठी कुटुंबातील प्रत्येक मुलाला सरकारकडून 18 वर्षांपर्यंत दीड हजार शेकल दिले जातात असे त्यांनी सांगितले. इस्त्राइलमध्ये सुमारे 30 हजार मराठी ज्यू आहेत. आम्ही महाराष्ट्र दिन तिथे मोठ्या उत्साहात साजरा करतो. ’ मायबोली’ या मासिकाच्या माध्यमातून मराठी भाषा आम्ही जिवंत ठेवली आहे. आमच्या पुढच्या पिढीला मराठीचा गंध नसला तरी आम्ही भारत आणि मराठीचे प्रेम जपले आहे. मराठी कधीच मरणार नाही, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. ............मोदींमुळे भारत-इस्त्राइल संबंध अधिक दृढ झालेपूर्वी पंडित नेहरूंचे इस्त्राइलबाबत धोरण तटस्थ असायचे. दोन्ही देशांमध्ये व्यापारी संबंध फारसे चांगले नव्हते. 1992 नंतर भारत ईस्त्राईलचे संबंध अधिकृतपणे प्रस्थापित झाले. वाजपेयी सरकारच्या काळात भारत आणि ईस्त्राईलचे संबंध सुधारण्यास सुरूवात झाली. मोदी सत्तेत आल्यानंतर हे संबंध अधिकच दृढ झाले. पूर्वी भारत गरीब देश वाटायचा पण आता सन्मान मिळत असल्याची भावना नोहा मस्सील यांनी व्यक्त केली. 

टॅग्स :PuneपुणेMaharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषदmarathiमराठीIsraelइस्रायल