मराठी भाषा संस्काराची तसेच जीवनाची भाषा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:13 IST2021-02-05T05:13:26+5:302021-02-05T05:13:26+5:30
जातेगाव बुद्रुक ता. शिरूर येथील श्री गुरुदत्त ग्रामविकास प्रतिष्ठानच्या श्री संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा संवर्धन ...

मराठी भाषा संस्काराची तसेच जीवनाची भाषा
जातेगाव बुद्रुक ता. शिरूर येथील श्री गुरुदत्त ग्रामविकास प्रतिष्ठानच्या श्री संभाजीराजे माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात मराठी भाषा संवर्धन पंधरवडा साजरा करण्यात आला. या वेळी प्राचार्य डॉ. ललितकुमार इंगवले, पी. सी. जाधव, एस. एस. उमाप, पूजा काटे, विकास आंधळे, मेघा गरुड, प्रज्ञा खोडदे, रोहिणी जऱ्हाड, मुक्ता मापारे आदी उपस्थित होते. कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. ललितकुमार इंगवले यांनी झूम मीटिंगद्वारे मराठी भाषेचे महत्त्व विद्यार्थ्यांना सांगितले. तसेच मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त चारोळीवाचन, काव्यवाचन व निबंध स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विजय गायकवाड यांनी केले तर प्रीती पवार यांनी आभार मानले.
जातेगाव बुद्रुक (ता. शिरूर) येथे मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त बोलताना प्रा. महावीर भिसे.(धनंजय गावडे)