शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

मेलबर्नमध्येही मराठी भाषेचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 27, 2019 01:36 IST

- प्रीती जाधव-ओझा । लोकमत न्यूज नेटवर्क पुणे : आपल्या राज्यात इंग्रजी शाळांमुळे मराठी शाळा बंद होत असताना आॅस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये ...

- प्रीती जाधव-ओझा ।लोकमत न्यूज नेटवर्क

पुणे : आपल्या राज्यात इंग्रजी शाळांमुळे मराठी शाळा बंद होत असताना आॅस्ट्रेलियातील मेलबर्नमध्ये मात्र गेल्या काही वर्षांपासून मराठी शाळा रूजत आहे. तिथे मराठी भाषा शिकण्यासाठी अनेकजण प्रयत्न करीत आहेत.

मातृभाषेशी नाळ तुटू नये म्हणून मेलबर्नमध्ये प्रसाद पाटील यांनी मित्र मंडळींच्या सहकार्याने मराठी शाळा सुरू केली आहे.प्रसाद पाटील हे मूळचे जळगावचे पण वडील शिक्षक असल्याकारणाने त्यांचे शिक्षण मराठी माध्यममधून रत्नागिरी येथे झाले. त्यानंतर इंजिनिअरिंगची पदवी घेऊन नोकरीनिमित्त मेलबर्न येथे २००९ सालापासून स्थलांतरित झाले. त्या ठिकाणी स्थायिक झाल्याने त्यांचा मुलगा आदित्य याने आॅस्ट्रेलियन संस्कृती जुळवून घेतली आहे. यामुळे प्रसाद पाटील यांना आपला मुलगा आपली संस्कृती विसरून आॅस्ट्रेलियन संस्कृतीशी एकरूप होतो का? अशी शंका भेडसावत होती.एकदा टीव्हीवरील मराठी कार्यक्रम पाहताना मुलांने विचारले हे काय पाहताय. चॅनेल बदला व इंग्रजी भाषेतील कार्यक्रम लावा अशी सूचना केली. यामुळे आपल्या मुलाला मातृभाषाच माहिती नाही, याची खंत वाटू लागली.मुलांने आॅस्ट्रेलियन संस्कृतीबरोबर मराठी संस्कृती टिकवून ठेवावी, अशी अपेक्षा होती. त्यामुळे प्रसाद पाटील यांनी आपल्या घरचे वातावरण नेहमी मराठमोळे ठेवले आहे.

पण आपल्या मुलाला मराठी लिहिता वाचतादेखील आले पाहिजे, असे त्यांना नेहमी वाटत होते. याबाबत त्यांनी आपली पत्नी हेमलता यांच्याशी चर्चा केली, व केवळ आपल्या मुलाला मराठी शिकविण्याऐवजी आपल्या मित्रमंडळींच्या मुलांनादेखील मराठी संस्कृती अवगत व्हायला हवे, याकरीता त्यांनी याबाबत आपल्या मित्रमंडळींशी चर्चा केली. यातून त्यांना मराठी शाळा सुरू करण्याची कल्पना सुचली.४सप्टेंबर २०१५ मध्ये मेलबर्न (डॅन्डेनॉगॅ) येथील सभागृहात संकल्प एक निश्चय या मराठी शाळेचा श्रीगणेशा झाला. या शाळेत येणारी मुले ही नियमित पणे सोमवार ते शुक्रवार नेहमीच्या इंग्रजी शाळेत जातात पण दर शनिवारी दुपारी मराठी शाळेत येऊ लागली. पहिल्या वर्षी ५ ते १३ वयोगटातील ४० विद्यार्थ्यांनी या शाळेत प्रवेश घेतला. प्रारंभी शाळेच्या खर्चाकरिता अभिनेता सुबोध भावे यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता.

४त्या कार्यक्रमातून जमा झालेल्या निधीमधून एक वर्ष या शाळेचा खर्च चालला. त्यानंतर पुन्हा निधीचा प्रश्न उभा ठाकला. त्यानंतर काही पालकांनी एकत्रित येऊन हा खर्च उचलण्याचे ठरविले.४सध्या या शाळेत शिशु वर्ग व मोठा वर्ग असे दोन वर्ग सुरू असुन ज्या विद्यार्थ्यांना लिहिता वाचता येते त्यांना मोठ्या वर्गात प्रवेश दिण्यात आला असून ज्या विद्यार्थ्यांनी नूतन प्रवेश घेतला आहे त्यांना शिशु वर्गात प्रवेश देण्यात आला आहे.