शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
2
पुण्यात भलामोठा आयकर रिटर्न घोटाळा; आयटी, मल्टीनॅशनल कंपन्यांचे कर्मचारी अडकले... 
3
बालेंद्र शाहांचा नकार; सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान? तरुणांचा सर्वाधिक पाठिंबा...
4
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!
5
मुंबई महापालिका निवडणुकीसाठी शिंदेसेनेची 'जम्बो टीम'; २१ नेत्यांची मुख्य कार्यकारी समिती जाहीर
6
आर्टिफिशियल फ्लेवर्स, प्रिझर्व्हेटिव्ह्जशिवाय घरीच करा 'अ‍ॅपल जॅम'; मुलं म्हणतील, यम्मी...
7
ठाकरेंचा आवाज छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर घुमणार; दसरा मेळाव्याला महापालिकेची परवानगी
8
Samruddhi Mahamarg : ‘समृद्धी महामार्गावर’वर दिसणारे ते खिळे नाहीत, मग काय?; समजून घ्या 'इपॉक्सी ग्राउटिंग' तंत्रज्ञान
9
वायफाय राउटरच्या बाजूला ठेवल्यात 'या' गोष्टी? आताच बाजूला करा अन्यथा...
10
आयटी सेक्टरमध्ये तेजी! गुंतवणूकदारांनी कमावले २.६४ लाख कोटी रुपये; 'हे' स्टॉक्स ठरले टॉप गेनर
11
वॉशिंग्टन सुरक्षित केले म्हणून डोनाल्ड ट्रम्प हॉटेलमध्ये जेवायला गेले...; लोकांनी जे केले...
12
अमरावतीची 'हवा'च न्यारी! देशात डंका, राष्ट्रीय स्तरावर पटकावला पहिला क्रमांक
13
उपराष्ट्रपती निवडणुकीत 'क्रॉस व्होटिंग'च्या संशयाची सुई; कोणत्या खासदारांनी ऐनवेळी पलटी मारली?
14
भरणी श्राद्ध २०२५: गुरुवारी भरणी श्राद्ध, एकदा करावे की दरवर्षी? अधिकार कोणाला आणि नियम काय?
15
भारतीय अर्थव्यवस्था सुसाट! टॅरिफचा धाक दाखवणाऱ्या अमेरिकेला 'फिच' रिपोर्टने धक्का! इतका वाढणार जीडीपी
16
भयंकर! नेपाळनंतर फ्रान्समध्ये सरकारविरुद्ध मोठं आंदोलन; रस्त्यावर जाळपोळ अन् तोडफोड
17
जिच्यासाठी माजी उपसरपंच गोविंद बर्गे यांनी आयुष्य संपवलं, ती पूजा गायकवाड कोण?
18
मस्तच! नवरात्रात कन्या पूजनानंतर मुलींना द्या 'ही' यूजफुल गिफ्ट्स; आनंदाने उजळतील चिमुकल्यांचे चेहरे
19
फुलांचा गजरा माळून गेली आणि फसली, ऑस्ट्रेलियात भारतीय अभिनेत्रीवर कारवाई, नेमकं कारण काय?  
20
कतारनंतर आता तुर्कीवर हल्ला करणार इस्रायल? हमासशी आहे थेट कनेक्शन!

मराठीच्या अभिजात दर्जाचा निर्णय लवकरच होईल : विनोद तावडे, पुण्यात प्रकाशक लेखक संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2018 12:30 IST

राज्य शासनाने मराठीच्या अभिजात दर्जासाठी सर्वतोपरी प्रयत्न आणि कार्यवाही केली आहे. केन्द्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच निर्णय होईल, पण नेमका केव्हा होईल याबाबत सांगण्यास मी सक्षम नाही, असे शालेय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.

ठळक मुद्देसीईटीच्या निर्णयाचा फायदा विद्यार्थ्यांनाच होईल : विनोद तावडे'विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला किंवा घेतला नाही तरी त्यांना पावती देणे बंधनकारक'

पुणे : मी मराठी भाषेचा पुरस्कर्ता आहे. राज्य शासनाने मराठीच्या अभिजात दर्जासाठी सर्वतोपरी प्रयत्न आणि कार्यवाही केली आहे. याबाबतची फाईल केंद्र सरकारकडे सुपूर्द  करण्यात आली आहे. केन्द्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत याबाबतच निर्णय होईल, पण नेमका केव्हा होईल याबाबत सांगण्यास मी सक्षम नाही, असे शालेय शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी सांगितले.महाराष्ट्र साहित्य परिषदेत प्रकाशक-लेखक संवाद या कार्यक्रमात ते बोलत होते. 

पुढे ते म्हणाले, तामिळनाडू कोर्टात यासंबंधीच्या याचिकेचा निर्णय झाला आहे. त्यामुळे केंद्रीय कॅबिनेट लवकरच निर्णय घेईल. मी राज्य कॅ बिनेटचा सदस्य आहे. त्यामुळे यासंबंधी सविस्तर सांगू शकणार नाही.सीईटीच्या निर्णयाबद्दल ते म्हणाले, की याचा फायदा विद्यार्थ्यांनाच होईल, नुकसान होणार नाही.दरम्यान सिंहगड इन्स्टिट्यूटमधील शिक्षकानी मे महिन्यात आंदोलन करावे, असा अजब सल्ला तावडे यांनी दिला. शैक्षणिक वर्ष सुरू असताना आंदोलन करून विद्यार्थ्यांचे नुकसान करू नये, अन्यथा विद्यार्थ्यांना दुसऱ्या कॉलेजमध्ये हलवण्यात येईल, असेही ते म्हणाले

आरटीई प्रवेशावेळी पावती मिळणार शिक्षण हक्क कायद्याअंतर्गत राज्यातील जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत. अनेक शाळा नोंदणी करत नसल्याने प्रवेशांचा प्रश्न निर्माण होतो. यापुढे विद्यार्थ्यांनी शाळेत प्रवेश घेतला किंवा घेतला नाही तरी त्यांना पावती देणे बंधनकारक राहणार आहे, असे तावडे यांनी सांगितले.

टॅग्स :Vinod Tawdeविनोद तावडेMaharashtra Sahitya Parishadमहाराष्ट्र साहित्य परिषदPuneपुणे