शहरं
Join us  
Trending Stories
1
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
2
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
3
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
4
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
5
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
6
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
7
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
8
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
9
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
10
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
11
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
12
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
13
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
14
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
15
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
16
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
17
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
18
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
19
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
20
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
Daily Top 2Weekly Top 5

Maratha Reservation : सातारा गॅझेटबाबत पावले उचलण्यास सुरुवात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2025 09:52 IST

सातारा गॅझेटचा अभ्यास करून तो अहवाल तीन ते चार दिवसांत सादर करावा अशा सूचना दिलेल्या आहेत. यावर पुणे विभाग स्तरावर काय झाले याबाबत चर्चा केली.

पुणे : मराठा आरक्षण लागू करण्यासाठी सातारा गॅझेटचा अभ्यास करून अहवाल देण्याच्या सूचना आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष व जलसंपदामंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी पुण्याच्या विभागीय आयुक्तांना केल्या होत्या. त्यानुसार समितीचे सदस्य आणि सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी शुक्रवारी याबाबतच्या कार्यवाहीची माहिती घेतली. मात्र, अहवालाबाबत ठोस माहिती देण्यास नकार दिला.मराठा आरक्षणाबाबत आंदोलकांकडून सातारा गॅझेटची सातत्याने मागणी करण्यात येत होती. मात्र, जरांगे यांच्या उपोषणानंतर झालेल्या निर्णयानुसार राज्य सरकारने केवळ हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा निर्णय घेतला होता, तर सातारा गॅझेटबाबत निर्णय घेतला नव्हता. मात्र, या मागणीबाबत दबाव वाढत गेल्यानंतर सातारा गॅझेट लागू करण्यासंदर्भातही प्रक्रिया सुरू होईल, अशी माहिती समितीचे सदस्य सार्वजनिक बांधकाममंत्री शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी दिली काही दिवसांपूर्वी साताऱ्यात दिली होती. त्यानंतर आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे यांनी पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांना सातारा गॅझेटचा अभ्यास करून अहवाल देण्याचे निर्देश दिले आहेत.त्यानंतर भोसले यांनी याबाबतच्या कार्यवाहीची माहिती पुलकुंडवार यांच्याकडून घेतली. यावेळी मदत व पुनर्वसनमंत्री मकरंद पाटील उपस्थित होते. याबाबत भोसले म्हणाले, उप समितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी सातारा गॅझेटबद्दल विभागीय आयुक्त यांना सूचना दिल्या आहेत. या सूचनांबद्दल चर्चा केली. पुढे काही जास्त चर्चा झाली नाही.

सातारा गॅझेटबद्दल अधिकृत बैठक नव्हती. उप समितीची बैठक घेण्याचे अधिकार हेच अध्यक्षांना आहेत. सातारा गॅझेटचा अभ्यास करून तो अहवाल तीन ते चार दिवसांत सादर करावा अशा सूचना दिलेल्या आहेत. यावर पुणे विभाग स्तरावर काय झाले याबाबत चर्चा केली. गॅझेटचा अभ्यास करून कुणबी व मराठे हे सिद्ध करण्याचे मोठे आव्हान सरकारसमोर आहे. त्यामुळे सरकारला दिलेल्या मुदतीत याचा अहवाल सादर करण्यासाठी तज्ज्ञांची समिती नेमावी लागणार आहे. तसेच मोडी लिपीतज्ज्ञांची मदत घ्यावी लागणार आहे. या गॅझेटमध्ये मराठ्यांची तत्कालीन सामाजिक व सांस्कृतिक स्थिती विषद करण्यात आली आहे.

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaratha Reservationमराठा आरक्षणPuneपुणे