शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

यातले काहीच न्यायालयात टिकणारे नाही, सरकारच्या अध्यादेशाबाबत उल्हास बापट यांचं मोठं विधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2024 08:02 IST

Maratha Reservation: राज्य सरकारने जो काही अध्यादेश काढला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे काही बोलले आहेत, त्यामधील काहीच न्यायालयात टिकणार नाही. कारण ते कायद्याच्या चौकटीत बसणारे नाही, असे स्पष्ट मत घटनातज्ज्ञ प्रा. डॉ. उल्हास बापट यांनी व्यक्त केले.

पुणे -  राज्य सरकारने जो काही अध्यादेश काढला आहे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जे काही बोलले आहेत, त्यामधील काहीच न्यायालयात टिकणार नाही. कारण ते कायद्याच्या चौकटीत बसणारे नाही, असे स्पष्ट मत घटनातज्ज्ञ प्रा. डॉ. उल्हास बापट यांनी व्यक्त केले. मराठा व ओबीसी यांंच्यातील सामंजस्याशिवाय यात दुसरा काहीही मार्ग नाही, असे ते म्हणाले. 

डॉ. बापट म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांनी ५० टक्क्यांपेक्षा जास्त आरक्षण दिले, पण न्यायालयात ते टिकले नाही. रद्द केले गेले. कारण ते ६४ टक्के झाले होते. ओबीसीमधून ते देता येईल. त्यासाठी आधी मराठा समाज मागास आहे हे सिद्ध व्हायला लागेल,  त्यात पुन्हा क्रिमीलेअरची व्याख्या करावी लागेल. कारण शिक्षणमहर्षी, साखर कारखानदार यांना तर मागास म्हणता येणार नाही. पण ते नंतर करता येईल.”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे म्हणणे आहे की, मराठा समाजाला ओबीसीमधून न देता स्वतंत्र आरक्षण देऊ. यावर काही वेगळे भाष्य मी करणार नाही. कारण मी राजकारणी नाही. पण घटना अभ्यासक म्हणून हे शक्य नाही, इतके मात्र नक्की म्हणेन. सर्वोच्च न्यायालयाच्या ९ न्यायाधीशांच्या पीठाने दिलेला निर्णय बदलायचा तर ११ न्यायाधीशांचे पीठ तयार करावे लागेल, असेही त्यांनी सांगितले.

 

टॅग्स :Maratha Reservationमराठा आरक्षणMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार