शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

‘मराठा समाजाचा समावेश ‘ओबीसी’त होणार नाही’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2020 06:49 IST

vijay wadettiwar : ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाकडून शुक्रवारी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी वडेट्टीवार यांच्यासोबत संवाद बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

पुणे : “मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लावण्याचा प्रश्नच येत नाही. कोणालाही ओबीसींच्या आरक्षणातून वाटा दिला जाणार नाही. मराठा समाजाचा समावेश ओबीसींमध्ये होणार नाही,” असे राज्याचे पुनर्वसन आणि ओबीसी कल्याण मंत्री विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केले. ओबीसी व्हीजेएनटी जनमोर्चाकडून शुक्रवारी पुण्यात एमपीएससीच्या विद्यार्थ्यांसाठी वडेट्टीवार यांच्यासोबत संवाद बैठकीचे आयोजन केले होते. त्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. वडेट्टीवार म्हणाले, मराठा समाजाला दिलेले आर्थिक दुर्बल घटकाचे (ईडब्लूएसचे) आरक्षण हे ऐच्छिक आहे. ज्यांची इच्छा असेल ते घेतील. मात्र ईडब्लूएसचा परिणाम सामाजिक आणि शैक्षणिक मागास प्रवर्ग (ईसीबीसी)च्या सर्वोच्च यालयात सुरू असलेल्या खटल्यावर होणार नाही. विधिज्ञांशी चर्चा करूनच हा निर्णय घेतलेला आहे. मराठा समाजाला आरक्षण देताना ओबीसी आरक्षणाला धक्का लागण्याचा प्रश्नच नाही. मुख्यमंत्र्यांनीही ही बाब आधीच स्पष्ट केली आहे. इतर राज्यांत ५० टक्क्यांच्या वर आरक्षण असतानाही न्यायालयात स्थगिती मिळाली नाही. महाराष्ट्र सरकारच्या आरक्षणावर मात्र न्यायालयाने स्थगिती दिली हे महाराष्ट्राचे दुर्दैव आहे. महाराष्ट्रावरच अन्याय का होतो हे कळत नाही, असे वडेट्टीवार म्हणाले. “न्यायालयाचा आपण आदर करतो. त्याची प्रतिष्ठा पाळतो. काही लोक म्हणतात अमुक सरकार असते तर, तमुक माणूस मुख्यमंत्री असता तर आरक्षणाचा प्रश्न निकाली निघाला असता. असे असेल तर मग सर्वोच्च न्यायालय कोणाच्या इशाऱ्यावर चालते का?” असा सवाल वडेट्टीवार यांनी केला.

‘काहीं’च्या हट्टामुळे एमपीएससी परीक्षा नाही“ओबीसींमध्ये कोणाचाही समावेश होता कामा नये, ही ओबीसी नेता म्हणून माझी भूमिका स्पष्ट आहे. एमपीएससीच्या परीक्षा घेऊ नका, असा काही लोकांचा दबाव आहे. न्यायालयाचा निकाल लागेल तेव्हाच परीक्षा घ्या, असा हट्ट काही लोकांचा असल्याने काही करता येत नाही. परीक्षा लवकर व्हावी ही सर्वांची इच्छा आहे पण काही लोकांना ते मान्य नाही.     - विजय वडेट्टीवार  

टॅग्स :Vijay Vadettiwarविजय वडेट्टीवारMaratha Reservationमराठा आरक्षण