शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

पुण्यात जीवावर बेतला पतंगाचा मांजा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 30, 2018 20:08 IST

मांज्यामुळे जखमी व मृत्यू होण्याच्या घटना वारंवार घडत असतानाही त्यावर ठोस कारवाई होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे.

ठळक मुद्देआंबेगाव परिसरातील सुर्या चौकामध्ये नायलॉन मांज्यामुळे तिघेजण जखमी पोलीस किंवा पालिका प्रशासनाकडून घटनेची दखल नाही

धनकवडी :- राष्ट्रीय हरित न्यायधिकरणाने पतंगाच्या मांज्यावर बंदी घातली असताना शहरात नायलॉन मांज्याची सर्रास विक्री होत आहे. मांज्यामुळे जखमी व मृत्यू होण्याच्या घटना वारंवार घडत असतानाही त्यावर ठोस कारवाई होत नसल्याचे स्पष्ट झाले आहे. आंबेगाव परिसरातील सुर्या चौकामध्ये नायलॉन मांज्यामुळे तिघेजण जखमी झाल्याची घटना रविवारी घडली. यात प्रशांत शिळीमकर (वय ४२, वर्षे रा.आंबेगाव पठार) हे जखमी झाले आहेत. आंबेगाव पठार येथे शिळीमकर हे आपल्या दुचाकीवरून जात असताना त्यांच्या मानेजवळ काहीतरी वळवळल्याचा भास झाला. दुचाकीचा वेग कमी असल्याने लगेच त्यांनी आपल्या उजव्या हाताने मानेजवळ काय वळवळत आहे हे पाहिले असता नायलॉनच्या धारधार मांज्यामुळे  त्यांच्या उजव्या हाताची दोन बोटे कापली गेली. मांज्याची धार इतकी होती की काप थेट हाडापर्यंत गेला. त्यांच्या एका बोटाला पाच तर दुसऱ्या बोटाला दोन टाके पडले आहेत.सुदैवाने दुचाकीचा वेग कमी असल्याने आणि प्रशांत यांच्या प्रसंग सावधनतेमुळे गळ्याला इजा होण्याऐवजी बोटे कापली गेली. त्यांच्या पाठोपाठ येणाऱ्या दुचाकीस्वाराच्या ओठाला तर दुसऱ्याच्या हाताला कापले. राजे चौकात लहान मुले पतंग उडवित असताना ही दुर्घटना घडली. प्रशांत शिळीमकर म्हणाले, याबाबत मी आंबेगाव पोलीस चौकीत तक्रार दाखल करण्यासाठी गेलो असता पोलिसांना मला सहकार्य केले नाही. ज्या मुलांच्या मांज्यामुळे ही घटना घडली ती घटनास्थळावरून निघून गेली असणार आता त्यांना कुठे शोधायचे कारण देत तक्रार नोंदवण्यास नकार दिला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी या प्रकरणाचा पाठपुरावा करण्याच्या उद्देशाने पुन्हा पोलीस चौकीत गेले असता तुम्ही आरोग्य विभागाकडे तक्रार करा, आम्ही याबाबत काही करू शकत नाही. असे बोलून त्यांची तक्रार नोंदवून घेण्यास नकार दिला. गेले तीन दिवस ते या प्रकरणाची तक्रार देण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, पोलीस प्रशासन किंवा पालिकाप्रशासनाकडून या घटनेची कोणतीही दखल घेतली जात नाही. ......................  मांज्यामुळे अनेक नागरिक जखमी झाले आहेत. काही जणांनी जीवही गमावला आहे. सहा महिन्यापुर्वी सुवर्णा मुजुमदार या तरुणीचा मृत्यू झाल्यानंतर सात आँक्टोंबरला पिंपरी चिंचवड मध्ये दुचाकीवरून जाणाऱ्या डॉक्टर युवतीचा मांज्याने गळा कापला जावून मृत्यू झालाहोता. त्यानंतर प्रशासनाने दुकानांवर छापे टाकून मांजा जप्त केला होता....................... महापौरांच्या सहा महिन्यांपूर्वी झालेल्या बैठकीत कारवायांचे स्वरूप कशाप्रकारे असेल याचे स्पष्ट संकेत धनकवडी - सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयाला नसल्याने कारवाई करता आली नाही. परंतु, आता क्षेत्रीय कार्यालय परिसरात मांज्याची विक्री करणाऱ्या दुकानांवर योग्य ती कारवाई केली जाईल.- राजू दुल्लम, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक,  सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय........................मांजावर कारवाई करण्याची महापालिका आणि पोलीस यांची संयुक्त जबाबदारी आहे. यापूर्वी ही परिसरात मांज्याची विक्री करणाऱ्या दुकानांचा शोध घेतला असता फारशी दुकाने आढळून आली नाही. परंतु या घटनेनंतर मांज्याची विक्री होत असलेल्या दुकानांचा पुन्हा शोध घेऊन कारवाई करण्यात येईल.- मधुकर सांळुखे, सहाय्यक पोलीस निरीक्षक, आंबेगाव पठार पोलीस चौकी 

टॅग्स :DhankawadiधनकवडीCrime Newsगुन्हेगारीkiteपतंगPoliceपोलिसPune Municipal Corporationपुणे महानगरपालिका