शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात आजपासून आचारसंहिता? निवडणूक आयोग दुपारी ४ वाजता घोषणा करणार
2
जिओ-हॉटस्टार सबस्क्रीप्शनमध्ये मोठी वाढ करण्याची शक्यता; ₹१,४९९ प्लॅनची किंमत थेट...
3
India’s Squad For Rising Star T20 Asia Cup: वैभव सूर्यवंशीला संधी; 'या' तारखेला रंगणार भारत-पाक सामना!
4
'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य
5
चीनने पाकिस्तानसमोर मैत्रीचा हात पुढे केला! भारताविरुद्ध जाण्याचा नवा कट? काय आहे ड्रॅगनची खेळी?
6
जगातील 'या' 9 देशांकडे 12,241 अण्वस्त्रे; रशिया-अमेरिका आघाडीवर, भारताचा कितवा नंबर..?
7
दररोज पाठवायचा अश्लील मेसेज, प्रायव्हेट पार्ट व्हिडिओ; अभिनेत्रीने एकदा भेटायला बोलावले अन्...
8
आता सरकारी कार्यालयात खेटे घालण्याची गरज नाही; घरबसल्या मिळेल जीवन प्रमाणपत्र
9
Sandeep Deshpande : "खास अशिशुद्दीन यांच्यासाठी..."; भाजपा नेत्यांचा फोटो शेअर करत मनसेचं 'व्होट जिहाद'ला प्रत्युत्तर
10
MHADA Lottery: पुणेकरांसाठी सुवर्णसंधी! 'म्हाडा'च्या लॉटरीत वाकड-हिंजवडीत फक्त २८ लाखांत घर; ६० लाखांची थेट बचत!
11
त्रिपुरी पौर्णिमा २०२५: त्रिपुरी पौर्णिमेला 'या' राशींवर लक्ष्मीकृपा; व्यापारात लाभ; मालमत्ता खरेदीचे योग
12
रोहित आर्या प्रकरणावर अभिनेता आस्ताद काळेने व्यक्त केला संशय, पोस्ट करत म्हणाला...
13
आता त्यांचे मोजकेच दिवस उरलेत, या देशाच्या राष्ट्रपतींना ट्रम्प यांची उघड धमकी   
14
हवाई प्रवाशांसाठी मोठी बातमी; अतिरिक्त शुल्काशिवाय विमान तिकिटे रद्द करता येणार, कंपन्यांची मनमानी थांबणार!
15
Harmanpreet Kaur: "हरमनप्रीत कौरला कर्णधारपदाच्या ओझ्यातून मुक्त करा", माजी क्रिकेटपटूची मागणी चर्चेत!
16
कारच्या बंद दरवाजात गुदमरले जीव, ५ जणांचा मृत्यू; Tesla कारविरोधात खटला दाखल, काय आहे प्रकरण?
17
Ladki Bahin Yojana: मेसेजची रिंग वाजली? लाडकी बहीण योजनेचे आज पैसे येणार; eKYC न केलेल्या महिलांचे काय?
18
लाडकी बहीण योजना ज्यांनी राबविली, ते म्हणाले 'आम्ही कर्जात आहोत'; MSP वेळी हात वर केले, केंद्राला पत्र
19
"सांगा, ही मतचोरी आहे की व्होट जिहाद?"; भाजपाचा विरोधी पक्षांना खोचक सवाल, दिली आकडेवारी
20
शनी ग्रहाच्या चंद्राने केमिस्ट्रीला देखील फेल केले; तेल आणि पाणी...

महाराष्ट्रात यंदा देखील पोलीस भरती प्रक्रियेत अनेक समस्या; भरतीची तयारी करणार्या उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 23:49 IST

यामधील मुंबई व यवतमाळ या दोन जिल्ह्यामध्येच सामाजीक आरक्षणानुसार प्रवर्गासाठी उपलब्ध जागांची सविस्तर माहिती दिली आहे.

बारामती :  महाराष्ट्र पोलीस दलामध्ये १५२९४ पदांची ऑनलाईन भरती प्रक्रिया सुरू झाली आहे. मात्र, या भरती प्रक्रियेत पोलीस बॅन्ड्स्मन तसेच अनाथ या घटकांच्या जाहीरातीमध्ये प्रत्यक प्रवर्गासाठी असणाऱ्या सामाजीक आरक्षणानुसार जागांची स्पष्टता नसल्यामुळे दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी उमेदवारांमध्ये प्रचंड नाराजी आहे. सध्या सुरु असलेल्या पोलीस भरती प्रक्रियेत बॅन्डस्मन पदासाठी मुंबई, यवतमाळ, पुणे शहर, सोलापूर शहर, छत्रपती सभाजीनगर ग्रामीण, वाशीम आणि गोंदिया अशा एकूण सात घटकात जागा देण्यात आल्या आहेत. यामधील मुंबई व यवतमाळ या दोन जिल्ह्यामध्येच सामाजीक आरक्षणानुसार प्रवर्गासाठी उपलब्ध जागांची सविस्तर माहिती दिली आहे. परंतु उर्वरीत पाच जिल्ह्यांत केवळ जागांची संख्या दिली आहे. त्यामध्ये प्रवर्ग निहाय उपलब्ध जागांचा उल्लेख नसल्याने अर्ज भरतांना उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.

तसेच बॅन्ड पोलीस भरती प्रमाणेच अनाथांना ही जाहीरातीमध्ये सामाजीक आरक्षणानुसार कोणत्या प्रवर्गाला किती जागा आहे. याबाबत स्पष्टता दिली नसल्यामुळे उमेदवारांमध्ये दरवर्षी प्रमाणे संभ्रम निर्माण झाला आहे. दरवर्षी अंतिम निकाल लागल्यानंतरच अनाथाच्या १ टक्के आरक्षणानुसार कोणत्यातरी एका समाजिक प्रवर्गातील एक,दोन जागा कमी करून त्या अनाथांना दिल्या जातात. त्यामुळे ज्या प्रवर्गाच्या जागा अनाथाला दिल्या जातात. त्या प्रवर्गातील उमेदवारांवर अन्याय होतो.

याबाबत बारामतीतील सह्याद्री करीअर अकॅडमीचे संचालक उमेश रूपनवर यांनी सांगितले की, याबाबत आम्ही गृहमंत्री, गृहसचिव त्याचबरोबर अपर पोलीस महासंचालक, प्रशिक्षण व खास पथके यांना यापुर्वी अनेकदा ई-मेल केले आहेत. तरी बॅन्डस्मन व अनाथ या घटकांच्या जाहिराती प्रसिध्द करतांना सामाजीक आरक्षणानुसार जागांचा तपशील देण्याबाबत गृह विभागाने विशेष दखल घ्यावी. पोलीस भरती अर्ज करताना किमान वयोमर्यादा १८ वर्षे आहे.

ही वयोमर्यादा अर्ज सादर करण्याच्या अंतिम दिनांकापर्यंत म्हणजे ३० नोव्हेंबर पर्यंत १८ वर्ष पूर्ण झालेल्या सर्व उमेदवारांना अर्ज करता येतील असे दरवर्षी प्रमाणे या वर्षीच्याही जाहिरातीत नमूद करण्यात आले आहे. परंतु प्रत्यक्ष अर्ज भरताना ज्या उमेदवरांचे वय १ जानेवारी २०१५ ला १८ पूर्ण झाले, फक्त त्यापर्यंतच्याच उमेदवारांनाचे अर्ज स्विकृत होत आहेत. त्यानंतर ३० नोव्हेंबर पर्यंत १८ वर्ष पुर्ण झालेल्या उमेदवारांचे अर्ज स्विकृत होत नाहीत. ही एक गंभीर तांत्रिक त्रुटी असल्यामुळे उमेदवरांमध्ये नाराजी आहे, तरी प्रशासनाने लवकरात लवकर यामध्ये दुरूस्त करावी,असे रुपनवर म्हणाले.

English
हिंदी सारांश
Web Title : Police recruitment in Maharashtra faces issues, causing confusion among candidates.

Web Summary : Maharashtra police recruitment faces issues with bandspersons' and orphans' quotas lacking clarity. Age criteria discrepancies further frustrate candidates. Experts urge resolution.
टॅग्स :Policeपोलिस