शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

आयुष्यमान भारत योजनेला अनेक खासगी रूग्णालयाकडून ठेंगा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2019 11:47 IST

पुणे शहरातील बहुतेक खासगी रुग्णालयाने योजनेकडे पाठ फिरवली आहे. 

ठळक मुद्देशहरातील केवळ दीड लाख कुटुंबांना योजनेच्या स्मार्ट कार्डचे वाटपआयुष्यमान भारत योजना सुरु ही २०१८ मध्ये सुरु

- सुषमा नेहरकर-शिंदे- पुणे : लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून मोदी सरकारने अत्यंत गाजावाजा करत आरोग्यासाठी ‘आयुष्यमान भारत योजना’ सुरु केली. या योजनेमुळे सर्वसामान्य व गरिब कुटुंबातील नागरिकांना आरोग्याच्या दर्जेदार सुविधा देण्यासाठी सरकारी व खासगी रुग्णालयांमध्ये तब्बल ५ लाख रुपयांपर्यंतचे उपचार मोफत करण्यात येणार आहेत. यासाठी तातडीने मोहिम हाती घेऊन पुणे शहरातील तब्बल १ लाख ३१ हजार ४०५ कुटुंबांना योजनेच्या कार्डचे वाटप देखील करण्यात आले. योजना सुरु होऊन एक वर्षांच्या कालावधी लोटला असून, पुणे शहरातील बहुतेक खासगी रुग्णालयाने योजनेकडे पाठ फिरवली आहे. आयुष्यमान भारत योजना सुरु ही २०१८ मध्ये सुरु केली. या योजनेतून एका कुटुंबाला पाच लाख रुपये विमा संरक्षण देण्यात येणार आहे. लाभार्थी कुटुंबातील व्यक्तींना कोणत्याही आजारांवर देशाच्या कुठल्याही भागातल्या रुग्णालयात उपचार घेता येणार आहेत. यासाठी प्रत्येक पात्र लाभार्थी कुटुंबाला स्मार्ट कार्डचे वाटप केले. यामध्ये देशात २०११ मध्ये झालेल्या सामाजिक, आर्थिक व जात सर्वेक्षणानुसार (एसईसीसी) लाभार्थ्यांची यादी तयार केली. यात ज्या कुटुंबाचे उत्पन्न एक लाखाच्या आत आहे अशा सर्व कुटुंबाचा आयुष्यमान भारत योजनेत समावेश केला आहे.    लोकसभा निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपने सर्व शासकीय यंत्रणांना हाताशी धरुण स्वतंत्र कॅम्प घेऊन आयुष्यमान भारत योजनेच्या स्मार्ट कार्डचे शहरातील पात्र लाभार्थ्यांना वाटप केले. यामध्ये देखील निवडणुकीसाठी मोदी सरकारने तुमच्या कुटुंबाला तब्बल ५ लाख रुपया पर्यंत मोफत आरोग्य सुविधा उपलब्ध करुन दिली असून, मतदानासाठी नक्की घराबाहेर पडा सांगत ‘एक लाभार्थी एक मतदान’ अशी खास मोहिमच हाती घेतली होती. आता विधानसभा निवडणुकीसाठी देखील मोदी सरकारच्या सर्व योजनेच्या लाभार्थ्यांना टार्गेट करण्याचे भाजपने नियोजन केले आहे. --------------आयुष्यमान योजने अतंर्गत उपचार मोदी सरकारने योजनेची घोषणा करताना देशातील सर्व गरिब व सर्वसामान्य कुटुंबातील रुग्णांना सरकारी व खाजगी रुग्णालयांमध्ये मोफात उपचार उपलब्ध होणार असल्याचे म्हटले हाते. खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार केल्यानंतर विम्याची रक्कम मिळवून देण्यासाठी आयुष्मान मित्र मदत करतील. रुग्ण भरती करुन घेण्यापासून ते त्याला विम्याची रक्कम मिळवून देण्यापर्यंतची जबाबदारी आयुष्मान मित्राची राहणार आहे. परंतु अद्याप असे आयुष्यमान मित्राची नियुक्ती झाली नसून, एकाही खाजगी रुग्णालयामध्ये या अतंर्गत उपचार सुरु झाले नाहीत. ---------------------------------सध्या या रुग्णालयांमध्ये मिळातत आयुष्यमान भारत योजनेचे लाभ- केअर रुग्णालय, केसनंद,- नोबल रुग्णालय, हडपसर- सह्याद्री रुग्णालय, कर्वेरोड- सुर्या सह्याद्री हॉस्पीटल, शनिवारवाड्या शेजारी- ससून जनरल रुग्णालय, शासकीय रुग्णालय--------------------------------------

टॅग्स :PuneपुणेPune Municipal Corporationपुणे महानगरपालिकाhospitalहॉस्पिटल