देहदानातून अनेकांना मिळेल नवे आयुष्य
By Admin | Updated: August 7, 2015 00:23 IST2015-08-07T00:23:13+5:302015-08-07T00:23:13+5:30
पुण्याहून मुंबईला हृदय पोहोचवीत असताना या कामगिरीचे भविष्यात इतक्या मोठ्या प्रमाणात कौतुक होईल, असे वाटले नव्हते. वाहतूक पोलिसांपेक्षा पुण्यातील

देहदानातून अनेकांना मिळेल नवे आयुष्य
पुणे : पुण्याहून मुंबईला हृदय पोहोचवीत असताना या कामगिरीचे भविष्यात इतक्या मोठ्या प्रमाणात कौतुक होईल, असे वाटले नव्हते. वाहतूक पोलिसांपेक्षा पुण्यातील ज्या नातेवाइकांनी देहदानाकरिता परवानगी दिली, त्यांना हृदय प्रत्यारोपणामुळे मुंबईतील तरुणाला जीवनदान मिळवून दिल्याचे श्रेय जाते. देहदानातून आपल्याच बांधवांना नवे आयुष्य मिळते. त्यामुळे प्रत्येकाने याकरिता पुढे यायला हवे, असे मत शहर वाहतूक पोलीस उपायुक्त सारंग आवाड यांनी व्यक्त केले.
पुण्याहून मुंबईला अत्यल्प वेळेत हृदय पोहोचवून एका तरुणाला जीवनदान मिळवून देण्यात मोलाची कामगिरी बजावल्याबद्दल आवाड यांचा शुक्रवार पेठेतील सेवा मित्र मंडळ येथे जय गणेश व्यासपीठातर्फे बुधवारी मानपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
या वेळी वाहतूक पोलीस निरीक्षक शंकर डामसे, श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती ट्रस्टचे अध्यक्ष अशोक गोडसे, कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी, अॅड. प्रताप परदेशी, ढोल-ताशा महासंघाचे अध्यक्ष पराग ठाकूर, सेवा मित्र मंडळाचे अध्यक्ष शिरीष मोहिते, डॉ. मिलिंद भोई, उदय जगताप, आनंद सराफ, पीयूष शहा, नितीन पंडित, उमेश सपकाळ, सुनील रासने, प्रशांत जाधव उपस्थित होते.
डॉ. मिलिंद भोई यांनी सूत्रसंचालन केले. पराग ठाकूर यांनी आभार मानले.