आघाडी लांबल्याने अनेकांचा जीव टांगणीला

By Admin | Updated: January 29, 2017 14:08 IST2017-01-29T14:08:50+5:302017-01-29T14:08:50+5:30

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडीची चर्चा लांबत चालल्याने आपल्या तिकीटाचे काय होणार या चिंतेने दोन्ही पक्षातील इच्छुकांच्या जीव टांगणीला लागला आहे़

Many people have died due to the delay | आघाडी लांबल्याने अनेकांचा जीव टांगणीला

आघाडी लांबल्याने अनेकांचा जीव टांगणीला

 

 

आघाडी लांबल्याने अनेकांचा जीव टांगणीला

पुणे : शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामधील युती फुटल्याने शिवसेनेने जल्लोष केला़ भाजपमधील अनेकांचा जीव भांड्यात पडला़ त्याचवेळी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील आघाडीची चर्चा लांबत चालल्याने आपल्या तिकीटाचे काय होणार या चिंतेने दोन्ही पक्षातील इच्छुकांच्या जीव टांगणीला लागला आहे़ 

मागील महापालिका निवडणुकीत अनेक प्रभागात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांमध्येच लढत झाली होती़ त्यामुळे हे प्रभाग आपल्याकडे हवेत, अशी दोन्ही पक्षांची मागणी आहे़ आघाडीची चर्चा सुरु होण्यापूर्वी अनेकांना पक्षाकडून ग्रीन सिग्नल मिळाल्याने त्यांनी प्रचारालाही सुरुवात केली आहे़ पण, अचानक आघाडीची चर्चा सुरु झाली़ आघाडीसाठी अजित पवार हे स्वत: इच्छुक असल्याने काँग्रेससाठी आणखी काही जागा सोडण्याची तयारी दाखविली जात आहे़ परंतु, काही जागांबाबत दोन्ही पक्ष आग्रही आहेत़ आपल्या जागेबाबत दोन्ही पक्ष आग्रही असल्याचे समजल्याने दोन्ही पक्षातील इच्छुकांचे मात्र धाबे दणाणले आहे़ त्यांनी प्रचार थांबवून वरिष्ठ नेत्यांच्या गाठीभेटी घेण्यास सुरुवात केली आहे़ 

त्यामुळे शनिवारी होणाºया काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या आघाडीबाबत काय निर्णय होतोय, याकडे या सर्व इच्छुकांचे लक्ष लागले आहे़ त्यांची फोनाफोनी सुरु होती़ मधूनच एखाद्या समर्थकांचा फोन येत असे़ तो आपले तर तिकीट फिक्स आहे ना ?़ असे सांगत तेव्हा त्याला सांगताना इच्छुकांना तारेवरची कसरत करावी लागत होती़ रात्री उशिरापर्यंत आघाडीच्या बैठकीत नेमके काय ठरले़ आपला प्रभाग कोणाला सुटला याची खात्री त्यांच्याकडून केली जात होती़ 

 

Web Title: Many people have died due to the delay

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.