शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांना गंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 24, 2021 04:09 IST2021-06-24T04:09:44+5:302021-06-24T04:09:44+5:30

पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांना गंडा घालणाऱ्यास बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मण हरिभाऊ जोरी (रा. गोऱ्हे ...

Many are tempted by the lure of investing in the stock market | शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांना गंडा

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांना गंडा

पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने अनेकांना गंडा घालणाऱ्यास बिबवेवाडी पोलिसांनी अटक केली आहे. लक्ष्मण हरिभाऊ जोरी (रा. गोऱ्हे बुद्रुक, ता. हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याने बिबवेवाडी, तळेगाव दाभाडे, पिंपरी, नाशिकमधील अनेकांची फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. जोरीने शेअर बाजारात गुंतवणुकीबाबत जाहिरात केली होती. एक लाख रुपये गुंतवल्यास दिवसाला दोन ते पाच हजार रुपये नफा मिळवा, असे आमिष त्याने जाहिरातीद्वारे दाखविले होते. बिबवेवाडी भागातील एका तक्रारदाराची त्याने फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता. गेले वर्षभर तो पोलिसांना गुंगारा देत होता. बिबवेवाडी पोलीस ठाण्यातील तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक राजेश उसगावकर यांना मिळालेल्या माहितीवरून पोलीस अंमलदार सतीश मोरे यांनी तांत्रिक विश्लेषण करून हवेली तालुक्यातील गोऱ्र्हे बुद्रुक येथे जाऊन सापळा लावून स्थानिकांच्या मदतीने लक्ष्मण जोरी याला पकडले. त्यांच्याकडे अधिक चौकशी केली असताना त्याने संपूर्ण महाराष्ट्रात शेकडो लोकांना करोडो रुपयांचा गंडा घातल्याचे कबूल केले.

पोलीस उपायुक्त नम्रता पाटील, सहायक आयुक्त राजेंद्र गलांडे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील झावरे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक अनिता हिवरकर, उसगावकर, अमित पुजारी, सतीश मोरे, तानाजी सागर, श्रीकांत कुलकर्णी आदींनी ही कारवाई केली.

.........

जोरी सध्या येरवडा कारागृहात असून त्याने अनेकांची फसवणूक केल्याची शक्यता आहे. ज्यांची फसवणूक झाली असेल, त्यांनी नजीकच्या पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन बिबवेवाडी पोलिसांनी केले आहे.

Web Title: Many are tempted by the lure of investing in the stock market