शहरं
Join us  
Trending Stories
1
काश्मिरात अतिरेकी हल्ला, २८ ठार; 'टार्गेट किलिंग'मध्ये महाराष्ट्रातील पर्यटकांचाही समावेश
2
रुपचंदानी कुटुंबीय पहलगाममध्ये सुखरूप; काळजीनं नातेवाईकांचा जीव लागला होता टांगणीला
3
'यूपीएससी'त पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा; राज्यातील ९५ विद्यार्थ्यांनी घातली यशाला गवसणी
4
पोप फ्रान्सिस यांच्या निधनामुळे कर्मयोगी जवाहरलाल दर्डा यांच्या पुतळ्याचे अनावरण स्थगित
5
KL राहुलचं एकदम कूल सेलिब्रेशन! मग संजीव गोयंका यांच्या हातात हात दिला; पण... (VIDEO)
6
मत्स्य व्यवसायाला कृषी समकक्ष दर्जा, मंत्रिमंडळाचा निर्णय; मच्छीमारांना ६ हजाराचा लाभ मिळणार
7
भिसेंवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांची होणार चौकशी; महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचा निर्णय
8
एक मंदिर, एक विहीर, एक स्मशान...डॉ. भागवतांच्या संप्रदायाला ही एकता समजली तरी खूप बरे होईल
9
गुलफिशा फातिमाने तुरुंगात खितपत का पडावे?; २ वर्ष उलटली तरी जामीन नाही  
10
पहलगाम मध्ये तुमच्या ओळखीचे कुणी अडकले असेल तर 'या' तीन क्रमांकावर साधू शकता संपर्क
11
Rishabh Pant : पंतनं हिंमत दाखवली नाही की, तो किंमत शून्य झालाय? एक निर्णय अन् अनेक प्रश्न
12
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
13
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
14
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
15
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
16
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
17
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
18
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
19
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
20
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल

कलाकारांना पाहण्यासाठी अनेक जण उत्सुक; पुणेकर म्हणतायेत, कलावंत पथक गेलं कुठं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 18, 2024 15:38 IST

आम्हाला पाहण्यासाठी असंख्य लोकांची गर्दी होत असल्याने त्या गर्दीचे मॅनेजमेंट करताना मंडळाला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते, असे आमच्या ऐकण्यात आले होते

पुणे: पुण्याच्या वैभवशाली मिरवणुकीत पथकांच्या वादनाचे वेगळेच आकर्षण दरवर्षी दिसून येते. निरनिराळे ताल, त्यावर ठेका धरणारे नागरिक, लेझीम, यामुळे विसर्जन मिरवणुकीचा उत्साह वाढतो. पुण्यात ७०० ते ८०० ढोल पथके आहेत. विशेष म्हणजे सगळ्या पथकांना बाप्पासमोर वाजवण्याची संधी मिळते. या पथकात तरुण- तरुणी बरोबरच ज्येष्ठांचाही समावेश असतो. तर कलाकारही आवडीने या वैभवशाली मिरवणुकीत पथकात वाजवण्याची हौस पूर्ण करतात. असे कलावंत पथक यंदाच्या मिरवणुकीत दिसून आले नाही. त्यामुळे बरेच पुणेकर नाराज झाल्याचे समोर आले आहे.  मानाचा पहिला श्री कसबा गणपतीच्या मिरवणुकीने पुण्याच्या विसर्जनाची सुरुवात होते. दरवर्षी कलावंत पथक श्री कसबा गणपतीच्या मिरवणुकीला वादन करते. यंदा मात्र ते पथक दिसलेच नसल्याने पुणेकरांमध्ये नाराजीचा सूर उमटला होता. कलावंत पथकात अजय पुरकर, सौरभ गोखले, सिद्धार्थ जाधव, श्रुती मराठे, शाश्वती पिंपळकर, प्राजक्ता हणमघर, माधवी सोमण, ज्योती मालशे, तेजस्विनी पंडित, हृषीकेश जोशी, ऋजुता देशमुख, पीयूष रानडे, मयूरी वाघ, अनुजा साठे, परी तेलंग, केतन क्षीरसागर, श्रीकार पित्रे, प्रसाद जवादे, राधिका देशपांडे, मधुरा देशपांडे, नूपुर दैठणकर, तेजश्री वालावलकर, अश्विनी कुलकर्णी, बिपीन सुर्वे, तेजस बर्वे ही कलाकार मंडळी आहेत. यांना पाहण्यासाठी पुणेकरांबरोबरच राज्यातून येणारे नागरिक उत्सुक असतात. त्यांच्याबरोबर वादनाचा आनंदही घेतात. पण तो क्षण यंदा पुणेकरांना अनुभवता आला नाही. 

कलावंत पथक मिरवणुकीत यंदा आझाद व्यायाम मंडळाच्या मिरवणुकीत वादनाला होते. ते मिरवणुकीत सकाळपासून का आले नाहीत? याबाबत पथकाचे कलाकार सौरभ गोखले यांच्याशी लोकमतने संवाद साधला. गोखले म्हणाले, कलावंत पथक दरवर्षी मानाचा पहिला श्री कसबा गणपतीच्या मिरवणुकीला वादन करत असते. परंतु यंदा कसबा गणपती मंडळाला दुसऱ्या पथकाला संधी द्यायची होती. आम्ही दरवर्षी मानाच्या पहिल्या मंडळात वाजवायला आल्यावर आम्हाला पाहण्यासाठी लोकांची खूप गर्दी होते. त्या गर्दीचे मॅनेजमेंट करताना मंडळाला अनेक अडथळ्यांना सामोरे जावे लागते. असे आमच्या ऐकण्यात आले होते. म्हणूनच आम्हाला ती सुपारी मिळाली नाही. अनेक पथकांची कसबा गणपतीसमोर वाजवण्याची इच्छा असते. त्यांनाही संधी मिळायला हवी. परंतु यंदा आम्ही वाजवण्याची संधी न सोडता सायंकाळी लक्ष्मी रोडला बहारदार वादन केले.     

टॅग्स :Ganesh Mahotsavगणेशोत्सव 2024Ganpati Festivalगणेश चतुर्थी २०२४SocialसामाजिकartकलाcinemaसिनेमाAjay Purkarअजय पुरकरSiddharth Jadhavसिद्धार्थ जाधवShruti Maratheश्रुती मराठे