पालिकेकडून तब्बल ४२ ‘सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र’ घोषित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:17 IST2021-03-04T04:17:53+5:302021-03-04T04:17:53+5:30
पुणे : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने पालिकेकडून उपाययोजना सुरू केल्या आहेत. रुग्ण आढळून प्रमाण अधिक असलेल्या शहरातील ४२ ...

पालिकेकडून तब्बल ४२ ‘सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र’ घोषित
पुणे : शहरात कोरोनाचे रुग्ण वाढत चालल्याने पालिकेकडून उपाययोजना सुरू केल्या आहेत. रुग्ण आढळून प्रमाण अधिक असलेल्या शहरातील ४२ भाग ‘सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र’ घोषित केले आहेत. ज्या पालिकेच्या १५ पैकी दहा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत ही क्षेत्र असून, पाच क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत एकही क्षेत्र नाही.
कोरोना आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलेल्या आदेशानुसार, पालिकेने ज्या भागात कोरोना रुग्ण वाढत आहेत, असे भाग सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र निश्चित काही प्रमाणात निर्बंध घालण्यास सुरुवात केली आहे.
===
सोसायट्यांमध्ये प्रवेश बंद
* बाहेरील नागरिकांना सूक्ष्म प्रतिबंधक क्षेत्र असलेल्या सोसायट्यांमध्ये जाण्यास मनाई
* या सोसायट्यांच्या बाहेर बॅरिकेड्स लावण्यात येणार
* रुग्णांच्या घरातील नातेवाईक, व्यक्तींना बाहेर पडण्यास मनाई
* सोसायटीच्या सभासदांची बैठक घेऊन सूचना देत एकत्र येण्यास मनाई केली जाणार
* या सोसायट्यांमधील कचऱ्याची पालिकेकडून स्वतंत्रपणे विल्हेवाट
===
बाधित नसलेल्यांना कामाची मुभा
ज्या घरात कोणीही बाधित नसतील त्यांना दैनंदिन कामकाजासाठी बाहेर पडता येणार आहे.
===
शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता त्याला अटकाव करणे आवश्यक आहे. त्याकरिता पालिकेकडून प्रतिबंधात्मक उपाय योजना सुरू आहेत. शहरात ४२ सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र निश्चित करण्यात आले आहेत. नागरिकांनी काळजी आणि खबरदारी बाळगणे गरचेचे आहे.
- रुबल अगरवाल (अतिरिक्त महापालिका आयुक्त)
------
क्षेत्रीय कार्यालय सूक्ष्म प्रतिबंधित क्षेत्र
हडपसर ०७
बिबवेवाडी ०५
धनकवडी ०५
भवानी पेठ ०५
सिंहगड रस्ता ०४
शिवाजीनगर ०४
वारजे-कर्वेनगर ०४
वानवडी ०३
नगर रस्ता ०३
कोंढवा-येवलेवाडी ०२