शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

नग्न फोटो व्हायरल करण्याची धमकी, मांत्रिकाचा महिलेवर बलात्कार; पुण्यातील धक्कादायक घटना

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2022 21:21 IST

जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत पीडित महिलेवर मांत्रिकाने तिला ब्लॅकमेल करीत वेळोवेळी बलात्कार...

मंचर (पुणे) : पतीवर मृत्यूचे सावट असून त्यावर उपाय म्हणून व्हिडीओ कॉल करीत महिलेला विवस्त्र होण्यास मांत्रिकाने सांगितले. त्यानंतर त्याचे स्क्रीन शॉट काढून महिलेला ब्लॅकमेल करीत तिच्यावर वारंवार बलात्कार करण्यात आला. याप्रकरणी भोंदू मांत्रिक विक्रम नामदेव गायकवाड (रा. बुरूडगाव रोड, जि. नगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. मांत्रिक फरार झाला आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पीडित महिलेची भोंदू मांत्रिक विक्रम नामदेव गायकवाड यांच्याबरोबर ओळख झाली होती. जानेवारी ते सप्टेंबरपर्यंत पीडित महिलेवर मांत्रिकाने तिला ब्लॅकमेल करीत वेळोवेळी बलात्कार केला. मी मोठा मांत्रिक व ब्रह्मचारी आहे, असे भोंदू मांत्रिकाने महिलेला खोटे सांगितले. तिचा विश्वास संपादन केला. संबंधित महिला व तिच्या पतीवर मृत्यूचे सावट असून, त्यावर उपाय म्हणून व्हिडीओ कॉल करून महिलेला विवस्त्र होण्यास सांगितले. महिलेचे विवस्त्र अवस्थेतील फोटोचे स्क्रीन शॉट काढण्यात आले. हे फोटो महिलेला दाखवून तिला ब्लॅकमेल करण्यात आले.

हे फोटो महिलेच्या पतीला दाखवून संसार मोडण्याची भीती दाखवण्यात आली. महिलेची इच्छा नसताना तिला वारंवार मारहाण करीत बलात्कार करण्यात आला. मी मार्कोस कमांडो असून, एन्काउंटर स्पेशालिस्ट आहे. या प्रकाराबाबत कोणाला काही सांगितले तर भररस्त्यात गोळी घालून ठार मारण्याची धमकी या भोंदू मांत्रिकाने महिलेला दिली.

पतीपासून घटस्फोट देण्याची, तसेच पती व मुलांना जिवे मारण्याची धमकी या मांत्रिकाने दिली व वेळोवेळी मारहाण करीत बलात्कार केला. संबंधित महिलेने यासंदर्भात मंचर पोलिस ठाण्यात धाडस करून फिर्याद दिली आहे. पोलिसांनी भोंदू मांत्रिक विक्रम नामदेव गायकवाड (वय ३७, रा. जयभवानी निवास बुरूडगाव रोड, जि. अहमदनगर) याच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. मांत्रिक फरार झाला असून, पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. पुढील तपास महिला पोलिस उपनिरीक्षक रूपाली पवार करीत आहेत.

टॅग्स :Puneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडCrime Newsगुन्हेगारी