शहरं
Join us  
Trending Stories
1
काहीतरी मोठे घडणार...! दोन लढाऊ विमानांच्या संरक्षणात नेतन्याहूंनी देश सोडला; खासगी कंपन्यांची विमानेही इस्रायलबाहेर निघाली...
2
कराडची कन्या 'त्या' विमान अपघातात गमावली! शहरवासीयांमधून हळहळ व्यक्त
3
इराणमध्ये पुन्हा इस्रायलची लढाऊ विमाने घुसली; हल्ले सुरु, प्रत्युत्तरात येमेनहून मिसाईल डागली
4
पाकिस्ताननंतर इराणचे हवाई क्षेत्रही बंद; विमानांना सौदीच्या आकाशातून जावे लागणार 
5
१२ हजार ४०० झाडे तोडण्याऐवजी मेट्रो कारशेडसाठी पर्यायी जागांचा व्हावा विचार; मुख्यमंत्र्यांना स्थानिक भाजपा नेत्याचे साकडे 
6
इराणवर हल्ला केल्यानंतर नेतन्याहूंचा पंतप्रधान मोदींनी फोन, काय झाली चर्चा...
7
डॉक्टरांची मेस चालविणारी आजी आणि दोन वर्षांची नात बेपत्ता; ना मृतांमध्ये नाव, ना जखमींमध्ये... मुलगा शोधतोय
8
मोठी अपडेट! सात मृतदेहांची ओळख पटली; विजय रुपाणींच्या मृतदेहाची ओळख पटलेली नाही, मृतांचा आकडा...
9
एसी कॉम्प्रेसर फुटल्यामुळे माहीममध्ये मोठी आग; होरपळून दोघांचा मृत्यू 
10
ओढ्याला आलेल्या पाण्यात वाहून गेलेला विद्यार्थी अमान भालदारचा मृत्यू: परिसरात हळहळ 
11
WTC Final 2025 : मार्करम-बावुमा जोमात! गत चॅम्पियन ऑस्ट्रेलिया कोमात!
12
Ahmedabad Plane Crash: विमानाच्या कॅप्टनकडे थोडाथोडका नाही, ८२०० तास उड्डाणाचा अनुभव होता; पण दुर्दैव हे की...
13
Sonam Raghuvanshi : सोनम रघुवंशीचा इंदूरमधील सीक्रेट फ्लॅट अखेर सापडला! कुठे होतं 'हे' लपण्याचं ठिकाण?
14
"मी झोपले होते, अचानक जोरदार स्फोट झाला, डोळे उघडले तेव्हा..."; अकोल्याची ऐश्वर्या कशी बचावली?
15
इराणवरील हल्ल्यानंतर इस्रायलचा मोठा निर्णय! जगभरातील दूतावास बंद केले; आता बदल्याची भीती
16
'जे धाडसी होत होते ते मारले गेले'; ट्रम्प यांनी इराणला धमकी दिली; म्हणाले, "करार करा नाहीतर..."
17
Israel Iran Conflict: इस्रायलच्या हवाई हल्ल्यात मारले गेलेले इराणचे 'ते' सहा अणुशास्त्रज्ञ कोण?
18
इराणच्या अण्वस्त्र ठिकानांवर इस्रायलचा पुन्हा हल्ला, केली तुफान बॉम्बिंग; ट्रम्प यांच्या धमकीनंतर, अ‍ॅक्शन मोडवर नेतन्याहू!
19
विमान अपघातावर डीजीसीएचा मोठा निर्णय! सर्व बोईंग ड्रीमलाइनरची प्रत्येक उड्डाणापूर्वी तपासणी होणार
20
WTC Final : मिचेल स्टार्कनं अर्धशतकासह रचला इतिहास; हेजलवूडच्या साथीनं ५० वर्षांचा विक्रमही मोडला

मराठा आरक्षणासाठी मनुष्यबळ आऊटसोर्स, मुंबईत स्वतंत्र कार्यालय, राज्य मागासवर्ग आयोगाकडील प्रलंबित प्रकरणे वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 14, 2017 05:55 IST

मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन उभे करण्यात आल्यानंतर शासनाने आरक्षणाचे काम राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविले आहे.

- लक्ष्मण मोरेपुणे : मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या माध्यमातून राज्यभर आंदोलन उभे करण्यात आल्यानंतर शासनाने आरक्षणाचे काम राज्य मागासवर्ग आयोगाकडे सोपविले आहे. मराठा आरक्षणाच्या कामासाठी स्वतंत्र कार्यालय उभारण्यात येणार असून त्यासाठी मुंबईमधील सार्वजनिक बांधकाम विभागाची इमारत आयोगाला उपलब्ध करून दिली जाणार आहे. अपु-या कर्मचारीसंख्येमुळे खासगी संस्थांकडून मनुष्यबळ ‘आऊटसोर्स’ केले जाणार असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.कोपर्डीच्या घटनेनंतर राज्यभरामध्ये मराठा समाजाचे विविध जिल्ह्यांमध्ये क्रांती मोर्चे निघाले होते. आरक्षणाच्या मुख्य मागणीसह अन्य मागण्याही मराठा समाजाने केलेल्या होत्या. त्याकरिता मुंबईमध्ये ९ आॅगस्ट रोजी महामोर्चा निघाला होता. त्या वेळी मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी उच्च न्यायालयात अहवाल सादर करण्यासाठी राज्य मागासवर्ग आयोगाकडे जबाबदारी सोपविण्यात आली होती. समाजाचा जिल्हास्तरावरील सामाजिक-आर्थिक-शैक्षणिक परिस्थितीचा अभ्यास करून त्याचा अहवाल सदस्यांनी शासनाला सादर करणे अपेक्षित आहे. यासोबतच मराठा आरक्षणासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमितीही स्थापन करण्यात आली.दरम्यानच्या काळात, आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती संभाजीराव म्हसे-पाटील यांचे निधन झाले. त्यामुळे बरेच दिवस रिक्त राहिलेल्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती एम. बी. गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली. मात्र, आयोगाकडे मनुष्यबळच नसल्याने प्रत्यक्ष कामाला अद्यापही सुरुवात होऊ शकलेली नाही. सार्वजनिक बांधकाममंत्री पाटील यांच्या अध्यक्षतेखालील मंत्रिमंडळ उपसमितीच्या दर आठवड्याला मराठा आरक्षणासंदर्भात बैठका होत आहेत. मात्र, आयोगाचे कामकाज सुरू होण्यास विलंब लागल्याचे चित्रआहे.मराठा समाजाच्या आरक्षणाबाबतीतल्या तीव्र भावना लक्षात घेता शासनाला याबाबत लवकरात लवकर निर्णय घेणे आवश्यक आहे.नारायण राणे समितीचे अध्यक्ष असताना राहिलेल्या तांत्रिक त्रुटी दूर करून नव्याने अहवाल सादर करण्याचे आव्हान आयोगासमोर आहे. आरक्षणाच्या कामकाजासाठी आयोगाला स्वतंत्र कार्यालयाची आवश्यकता आहे. त्यासाठी मुंबईतील सार्वजनिक बांधकाम विभागाची इमारत आयोगाला उपलब्ध करून दिली जाणार आहे.भरती करण्याची मागणीराज्य मागासवर्ग आयोगाचे कार्यालय पुण्यातील नवीन प्रशासकीय इमारतीमध्ये आहे. हे राज्यातील एकमेव कार्यालय असून या ठिकाणी सहा ते सात पदे मंजूर आहेत. त्यातील चार पदे रिक्त असून केवळ तीनच पदांवर सध्या कर्मचारी काम करीत आहेत. त्यामध्ये आयोगाचे संशोधन अधिकारी, लघुलेखक आणि शिपाई असे तीनच जण आहेत. त्यामुळे आयोगाकडील प्रलंबित प्रकरणे वाढली आहेत. दरम्यानच्या काळात, या प्रकरणांवर कार्यवाही करून सुनावणीला सुरुवात करण्यात आली आहे. मात्र, त्याची गती वाढण्याची आवश्यकता आहे. पुण्यातील कार्यालयामध्येही रिक्त पदे भरून नवीन पदांवर मनुष्यबळ देण्याची मागणी होत आहे.

टॅग्स :marathaमराठाreservationआरक्षण