मार्गासनी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनीषा काटकर बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:16 IST2021-02-17T04:16:19+5:302021-02-17T04:16:19+5:30

सरपंचपदी निवड तर खांबवडी गावचे दत्तात्रय हनुमंत गायकवाड हे निवडणूक लढवून विजयी झालेले मात्र उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली ...

Manisha Katkar unopposed as Sarpanch of Margasani Group Gram Panchayat | मार्गासनी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनीषा काटकर बिनविरोध

मार्गासनी ग्रुप ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी मनीषा काटकर बिनविरोध

सरपंचपदी निवड तर खांबवडी गावचे दत्तात्रय हनुमंत गायकवाड हे निवडणूक लढवून विजयी झालेले मात्र उपसरपंचपदी बिनविरोध निवड झाली आहे.

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून यांनी सोमनाथ आहेरकर व ग्रामसेवक रूपेश हारपुडे यांनी काम पाहिले. वेल्हे तालुक्यातील सर्वात मोठी लोकसंख्या व ग्रामपंचायत सदस्यसंख्या असलेली मार्गासनी ग्रुप ग्रामपंचायत असून आडवली, आस्कवडी, भागिनघर, मार्गासनी, खांबवडी अशी पाच मोठ्या गावांमधून गाव कारभारी निवडायचे असल्याने तालुक्यातील नागरिक व लोकप्रतिनिधींचे लक्ष येथील निवडीकडे लागले होते.

यामध्ये सोनाली संदीप कुंभार, अर्चना रामदास धायगावे, संजय हनुमंत वालगुडे, संभाजी पोपटराव इंगुळकर, हर्षदा उमेश दीक्षित या सदस्यांची बिनविरोध निवड झाली होती. यावेळी माऊली विठ्ठल दसवडकर, जयश्री दत्तात्रय पानसरे, अर्चना विशाल वालगुडे, गणेश वसंत पानसरे हे नवनिर्वाचित सदस्य उपस्थित होते.

--

फोटो ओळी : १६मार्गासनी सरपंच निवड

फोटो ओळी : . फोटोसाठी ओळ- सरपंच पदाची निवडणूक झाल्यानंतर निर्वाचित सरपंच मनीषा काटकर व उपसरपंच दत्ता गायकवाड व इतर सदस्य.

Web Title: Manisha Katkar unopposed as Sarpanch of Margasani Group Gram Panchayat