मनीष गजमल बेस्ट वेटलिफ्टर

By Admin | Updated: September 7, 2016 01:09 IST2016-09-07T01:09:20+5:302016-09-07T01:09:20+5:30

औद्योगिक क्रीडा संघटना आयोजित औद्योगिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत फेम आॅटोचा मनीष गजमल ‘बेस्ट वेटलिफ्टर’ ठरला. स्पर्धेत टाटा मोटर्सच्या वेटलिफ्टर्सनी चमकदार कामगिरी केली.

Manish Gajmal Best Weight Litter | मनीष गजमल बेस्ट वेटलिफ्टर

मनीष गजमल बेस्ट वेटलिफ्टर

पिंपरी : औद्योगिक क्रीडा संघटना आयोजित औद्योगिक वेटलिफ्टिंग स्पर्धेत फेम आॅटोचा मनीष गजमल ‘बेस्ट वेटलिफ्टर’ ठरला. स्पर्धेत टाटा मोटर्सच्या वेटलिफ्टर्सनी चमकदार कामगिरी केली.
स्पर्धेचे उद्घाटन ज्येष्ठ प्रशिक्षक बिहारीलाल दुबे यांच्या हस्ते आणि टाटा मोटर्सचे क्रीडाधिकारी मिलिंद गुंजाळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडले. सुधील म्हाळसकर यांनी प्रास्ताविक केले. नारायण औटी यांनी सुत्रसंचालन केले. बजरंग घोरपडे यांनी आभार मानले.
टाटा मोटर्समधील टीआरजी वसतिगृह सभागृहात झालेल्या स्पर्धेचा गटवार निकाल (कंसात कंपनीचे नाव आणि उचललेले एकूण वजन) : ५६ किलो : १) मनीष गजमल ( फेम आॅटो, १७३ किलो), २) नारायण औटी ( टाटा मोटर्स, १०५ किलो).
६२ किलो : १) ईश्वर मोरे (टाटा मोटर्स, १४८ किलो), २) धनंजय स्वामी ( टाटा मोटर्स, १२५ किलो). ६९ किलो : १) शिवानंद स्वामी ( इंड्युरन्स, १४७ किलो), २) मनोज थोरात ( महिंद्रा, १४० किलो),३) किशोर मुसळे ( टाटा मोटर्स, १३२ किलो).
७७ किलो : १) प्रशांत बेंद्रे ( टाटा मोटर्स, १७० किलो), कोलेश्वर माहतो (आर.के. दिवाण, १५२ किलो), ३) दादासाहेब चव्हाण ( टाटा मोटर्स, १३२ किलो).
८५ किलो : १) अक्षय ताम्हणे ( टाटा मोटर्स, १७१ किलो), २) अमोल मोराडे ( टाटा मोटर्स, १६० किलो), ३) मोहंमद अदनान ( फोर्बस मार्शल, १३७ किलो). ९४ किलो ( १) स्वप्निल जावळकर (सॅण्डविक, १६२ किलो),२) शशिकांत कटोरे ( टाटा मोटर्स, १४५ किलो),३) प्रशांत जाधव ( टाटा मोटर्स, १२५ किलो).
१०५ किलो : १) जी. सत्यनारायणन ( टाटा मोटर्स, १७० किलो), २) अक्षर दरे (इम्पॅक्ट, १३७ किलो), ३) शैलेश खैरे ( टाटा मोटर्स, १०५ किलो).
१०५ किलोवर : १) जोगबिंदर सिंग (वैष्णवी, १४५ किलो), २) शेखर रावडे (टाटा मोटर्स, १२८ किलो), ३) राहुल काळे ( टाटा मोटर्स, १०५ किलो). (प्रतिनिधी)

Web Title: Manish Gajmal Best Weight Litter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.