शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

शेतकऱ्यांची चेष्टा करणाऱ्या कोकाटेंनी राजीनामा द्यावा; पुण्यातून काँग्रेसची मागणी

By राजू इनामदार | Updated: May 30, 2025 16:19 IST

असंवेदनशील कृषीमंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी तातडीने घरचा रस्ता दाखवावा व महसूल यंत्रणेला आदेश देत नुकसानीत गेलेल्या पिकांचे पंचनामे करायचे आदेश द्यावेत

पुणे: अवकाळी पावसाने शेतकऱ्यांची अतोनात नुकसान केलेले असताना राज्याचे कृषीमंत्री माणिक कोकाटे, सरकारने काय मातीचे व मोकळ्या वावराचे पंचनामे करायचे का? असा प्रश्न करत आहेत. शेतकऱ्यांप्रती अशी असंवेदनशीलता दाखवणाऱ्या कोकाटे यांचा सरकारने राजीनामा घ्यावा अशी मागणी काँग्रेसने केली. भ्रष्टाचाराने बरबटलेल्या व त्याबद्दल न्यायालयाने शिक्षा सुनावलेल्या कोकाटे यांना शेतकऱ्यांचे दु:ख कळणार नाही असे काँग्रेसने म्हटले आहे.

पक्षाचे प्रदेश प्रवक्ते हनुमंत पवार म्हणाले, ”राज्यात पावसाने धुमाकुळ घातला. राज्याच्या जवळपास सर्वच भागातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. अशा वेळी सरकारने सर्व महसूल यंत्रणांना त्वरीत पंचनामे करायला सांगणे गरजेचे असते. त्यामुळेच शेतकऱ्यांना किती नुकसान भरपाई द्यायची ते निश्चित करता येते. त्याबाबत निर्णय घेण्याऐवजी कोकाटे यांनी सरकारने काय मोकळ्या वावरांचे व मातीचे पंचनामे करायचे का? असे जाहीर वक्तव्य केले.“ अशा असंवेदनशील कृषीमंत्र्याला मुख्यमंत्र्यांनी तातडीने घरचा रस्ता दाखवावा व महसूल यंत्रणेला आदेश देत नुकसानीत गेलेल्या पिकांचे पंचनामे करायचे आदेश द्यावेत अशी मागणी पवार यांनी केली.

नेमकं काय म्हणाले कोकाटे? 

वळवाच्या पावसाने महाराष्ट्र राज्यात हजारो हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. यात शेतातून काढून ठेवलेल्या आणि काढणीवर आलेल्या दोन प्रकारच्या कांद्याचाही समावेश आहे. शासकीय यंत्रणा उभ्या पिकाचे पंचनामे करीत असल्याच्या तक्रारींवर कृषिमंत्री ॲड. कोकाटे यांनी भाष्य केले. कापणी झालेल्या पिकांचे पंचनामे करून काय करणार, ढेकळांचे पंचनामे करायचे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. घरात आणून ठेवलेल्या मालाचे पंचनामे करता येणार नाहीत. शेतात नुकसान झालेले कांदा आणि अन्य जी पिके असतील, त्यांचे रितसर पंचनामे केले जातील, असे त्यांनी स्पष्ट केले होते. 

टॅग्स :PuneपुणेManikrao Kokateमाणिकराव कोकाटेfarmingशेतीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसChief Ministerमुख्यमंत्री