महागणपतीला आंबा व फुलांचे नैवेद्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 30, 2021 04:10 IST2021-05-30T04:10:23+5:302021-05-30T04:10:23+5:30

अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे ५ वा. अभिषेक व नैमित्तिक पूजा करण्यात आली. ...

Mango and flower offerings to Mahaganapati | महागणपतीला आंबा व फुलांचे नैवेद्य

महागणपतीला आंबा व फुलांचे नैवेद्य

अष्टविनायक तीर्थक्षेत्र श्री क्षेत्र रांजणगाव गणपती देवस्थान ट्रस्टच्या वतीने पहाटे ५ वा. अभिषेक व नैमित्तिक पूजा करण्यात आली. देवस्थानच्या वतीने दु.१२ वा. महापूजा व महानैवेद्य करण्यात आला.

गणेशभक्त ज्ञानेश्वर मारुती विधाटे ( निमगाव म्हाळुंगी) यांसकडून संकष्टी चतुर्थी निमित्त महागणपतीस ३१ डझन आंब्यांचा नैवेद्य देण्यात आला. तसेच दर चतुर्थी प्रमाणे प्रगतशील शेतकरी नानासाहेब दिनकर पाचुंदकर यांच्या वतीने मंदिर परिसरात व गाभाऱ्यात फुलांची आकर्षक सजावट करण्यात आली. गणेशभक्त विनायक जोशी (ठाणे) यांजकडून देवस्थान ट्रस्टला ५० हजार रुपये देणगी देण्यात आली.

कोरोना विषाणूचा प्रसार व प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन निर्णयानुसार प्रतिबंधात्मक उपाय म्हणून मंदिर भाविकांना दर्शनासाठी पूर्णपणे बंद असून "श्रीं" ची दैनंदिन पूजा, धार्मिक विधी नित्यनियमाने सुरू आहेत. त्यावेळी देवस्थान ट्रस्टचे डॉ. संतोष दुंडे, प्रा. नारायण पाचुंदकर, ॲड. विजयराज दरेकर, व्यवस्थापक बाळासाहेब गोऱ्हे, हिशोबनीस संतोष रणपिसे तसेच पुजारी मकरंद कुलकर्णी व पुजारी प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते.

--

फोटो पहिल्या पानावर

Web Title: Mango and flower offerings to Mahaganapati