मंगेश तेंडुलकर यांच्या व्यंगचित्रांचे ९० वे प्रदर्शन
By Admin | Updated: May 10, 2017 04:23 IST2017-05-10T04:23:30+5:302017-05-10T04:23:30+5:30
ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे ९० वे व्यंगचित्रप्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आले आहे. २०० हून अधिक राजकीय व्यंगचित्रे,

मंगेश तेंडुलकर यांच्या व्यंगचित्रांचे ९० वे प्रदर्शन
लोकमत न्यूज नेटवर्क
पुणे : ज्येष्ठ व्यंगचित्रकार मंगेश तेंडुलकर यांचे ९० वे व्यंगचित्रप्रदर्शन बालगंधर्व रंगमंदिरात आयोजित करण्यात आले आहे. २०० हून अधिक राजकीय व्यंगचित्रे, शब्दरहित संदेश, पॉकेट कार्टून, कॅरिकेचर आदींचा त्यामध्ये समावेश आहे. या प्रदर्शनाचे उद्घाटन शनिवारी, दि. १३ मे रोजी ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्या हस्ते होणार आहे.
हे प्रदर्शन दि. १३ ते १५ मे दरम्यान सकाळी ९.३० ते ८.३० या वेळेत बालगंधर्व कलादालनात सर्वांसाठी विनामूल्य खुुले आहे.