शहरं
Join us  
Trending Stories
1
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
2
Gold Silver Price Today: सोनं-चांदी झाली स्वस्त... लग्नसराईच्या कालावधीत खरेदीची वाट पाहत असाल तर पाहा काय आहेत नवे दर?
3
वडील आणि मुलांचं अपहरण, पण वाटेत गाडीचा भीषण अपघात, तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू, तर...
4
घाटकोपरमध्ये मराठी तरुणाला मारहाण; शौचालय वापरल्याचा राग, मनसे धडकताच गुजराती व्यावसायिक गायब
5
बारामतीत सुनेत्रा पवारांविरुद्ध ५५ अर्ज; काँग्रेसच्या आकाश मोरेंचाही अर्ज दाखल, हाकेंची माघार
6
ट्रम्प यांची एक धमकी अन् जागतिक बाजारात भूकंप! तेलाचा भडका, सोन्यानंही दीड लाखांचा टप्पा गाठला; भारताचं टेन्शन वाढलं
7
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
8
Home Cleaning Schedule: पाहुणे कधीही येऊ दे, तुमचं घर असेल नेहमी रेडी; फॉलो करा 'हे' साधे क्लीनिंग शेड्युल!
9
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
10
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
11
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
12
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपडेट? पटापट चेक करा
13
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
14
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
15
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
16
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
17
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
18
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
19
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
20
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
Daily Top 2Weekly Top 5

‘फुलेंच्या कार्याचं महत्त्व कमी करून आपल्या पूर्वजांचं महत्त्व वाढवणं योग्य नाही’ उदयनराजेंच्या वक्तव्यावर ओबीसी नेत्याचा संताप

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2025 12:13 IST

- महात्मा फुले जयंतीच्या दिवशी उदयनराजेंच्या वक्तव्यावरून वाद पेटला; ओबीसी नेते मंगेश ससाणे यांची तीव्र प्रतिक्रिया

पुणे - महात्मा ज्योतिबा फुले यांच्या जयंतीनिमित्त पुण्यात आयोजित कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. मात्र या कार्यक्रमात उदयनराजेंनी केलेल्या एका वक्तव्यामुळे नवा वाद उद्भवला आहे.उदयनराजे भोसले म्हणाले, "एका दृष्टीकोनातून पाहिलं तर महात्मा फुलेंनी थोरले प्रतापसिंह महाराज यांचं अनुकरण केलं. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत जर कोणी सर्वप्रथम पाऊल उचललं असेल, तर ते प्रतापसिंह महाराज होते. त्यांनी स्वतःच्या राजवाड्यात स्त्रियांसाठी शाळा सुरु केली होती. विशेष म्हणजे, याच राजवाड्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं प्राथमिक शिक्षण झालं."या वक्तव्यावर ओबीसी नेते मंगेश ससाणे यांनी जोरदार आक्षेप घेतला आहे. त्यांनी माध्यमांशी बोलताना म्हटलं, उदयनराजेंचं वक्तव्य मी तीन-चार वेळा ऐकलं. ते फुले वाड्यावर आले, त्याचा आदर आहे. पण महात्मा फुलेंच्या जयंतीच्या दिवशी येऊन त्यांच्या कार्याचं महत्त्व कमी करून आपल्या पूर्वजांचं महत्त्व वाढवणं योग्य नाही. ससाणे म्हणाले, महात्मा फुलेंनी १ जानेवारी १८४८ साली पहिली मुलींची शाळा सुरू केली. यावर उदयनराजेंना आक्षेप का आहे? त्यांनी जर नवा इतिहास शोधून काढला असेल, तर आतापर्यंतचे सर्व संशोधक आणि इतिहासतज्ज्ञ फेल ठरवले का?ते पुढे म्हणाले, प्रतापसिंह महाराजांनी शाळा सुरू केली असं म्हणता, तर त्या शाळेत शिकणाऱ्या मुली कोण होत्या? पुढे ती शाळा का टिकली नाही? उदयनराजेंनी आपल्या वंशज म्हणून तो शैक्षणिक वारसा पुढे का नेला नाही?  याचबरोबर ससाणे यांनी महात्मा फुलेंनी लिहिलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पहिल्या पोवाड्याची आठवण करून दिली. शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांचं संपूर्ण महाराष्ट्राला महत्त्व आहे. पण आज फुलेंच्या कार्याचं महत्त्व कमी करायचा प्रयत्न धक्कादायक आहे, असं ते म्हणाले. महात्मा फुले जयंतीच्या निमित्ताने फुलेंच्या कार्यावर प्रकाश टाकण्याऐवजी त्यांच्या योगदानावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या उदयनराजे भोसले यांच्या वक्तव्यामुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.

टॅग्स :PuneपुणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडOBCअन्य मागासवर्गीय जातीUdayanraje Bhosaleउदयनराजे भोसलेMahatma Phule Wadaमहात्मा फुले वाडा