मंगेश पाडगावकरांच्या स्वरांजलीने साहित्य संमेलनाची सांगता

By Admin | Updated: April 11, 2016 00:47 IST2016-04-11T00:47:17+5:302016-04-11T00:47:17+5:30

मराठी वाङ्मय परिषदेचा ६८व्या अधिवेशनाचा समारोप स्व. मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी झाला. बडोदा येथील चैतन्य मराठी भाषिक मंडळाने पाडगावकरांची गीते सादर करून त्यांना स्वरांजली अर्पण केली.

Mangesh Padgaonkar's Swaranjali congratulated literature conventions | मंगेश पाडगावकरांच्या स्वरांजलीने साहित्य संमेलनाची सांगता

मंगेश पाडगावकरांच्या स्वरांजलीने साहित्य संमेलनाची सांगता

बडोदा : मराठी वाङ्मय परिषदेचा ६८व्या अधिवेशनाचा समारोप स्व. मंगेश पाडगावकरांच्या कवितांनी झाला. बडोदा येथील चैतन्य मराठी भाषिक मंडळाने पाडगावकरांची गीते सादर करून त्यांना स्वरांजली अर्पण केली.
समारोपाच्या भाषणात संमेलनाचे अध्यक्ष डॉ. रामचंद्र देखणे म्हणाले, की मंगेश पाडगावकर म्हणजे कवितेचे आभाळ होय. आज ते आभाळच आपल्यासाठी खाली उतरले, जीवनाला सुंदरतेकडे नेणारा विचार म्हणजे साहित्य होय. वास्तवाची मांडणी जेव्हा सौंदर्याच्या अंगाने होते तेव्हाच साहित्य जन्म घेते.
तर, वास्तववादी सौंदर्याने जो नटवितो तो साहित्याकडे. मराठी मुलुखाबाहेर राहूनही मराठीला प्रेम करणाऱ्या बडोदेकरांचा अभिमान वाटावा, असे हे संमेलन झाले. दोन दिवस शाळा सुरू झाल्या आणि शब्दाच्या सामर्थ्यानेच प्रकाशित केला.
आनंदाची वाटचाल प्रवृत्ती आहे, तर त्या आनंदाचा मुक्काम ही निवृत्ती आहे. तेजस्वी आणि आनंदमय जीवन जगण्यासाठी प्रकृती दर्शन उभे राहते आणि शुद्ध प्रवृत्तीलाच निवृत्तीच्या तत्त्वरूपाला घेऊन जाते.
साहित्य प्रबोधन-निवृत्ती दर्शन कि प्रवृत्ती दर्शन या विषयावर हुंजे यांच्या अध्यक्षतेखाली परिसंवाद रंगला. त्यामध्ये डॉ. नरेंद्र पाठक (ठाणे), संकेत भोळे (बडोदा), निशा खेर यांनी भाग घेतला.
मूल्यांची मांडणी करीत समाज जीवनाला प्रवाहित करणारा प्रवृत्तीवाद संतांनी दिला, असे मत परिसंवादात मांडले गेले. दिलीप खोपकर यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Mangesh Padgaonkar's Swaranjali congratulated literature conventions

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.