मंगलदास बांदल यांना राष्ट्रवादीतून तिकीट नाही
By Admin | Updated: January 14, 2017 03:20 IST2017-01-14T03:20:13+5:302017-01-14T03:20:13+5:30
निवडणुका जाहीर झाल्या, की पैलवान मंगलदास बांदल कुठून शड्डू ठोकणार? याची चर्चा नेहमीच होते. या वेळी ती सुरू असतानाच

मंगलदास बांदल यांना राष्ट्रवादीतून तिकीट नाही
पुणे : निवडणुका जाहीर झाल्या, की पैलवान मंगलदास बांदल कुठून शड्डू ठोकणार? याची चर्चा नेहमीच होते. या वेळी ती सुरू असतानाच राष्ट्रवादीकडून त्याना तिकीट मिळणार नसल्याचे जवळजवळ स्पष्ट झाले आहे. राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष जालिंदर कामठे यांनी बांदल किंवा त्यांच्या पत्नी यांना तिकीट देणार नसल्याचे सांगितले.
दोन दिवसांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादीच्या मुलाखतीत बांदल यांच्या पत्नी रेखा बांदल यांचे नाव इच्छुक म्हणून समोर आले. या वेळी सुरेश घुले यांनी ज्यांची पक्षातून हाकलपट्टी करण्यात आली आहे, त्यांच्या पत्नीचा इच्छुक म्हणून अर्ज आलाच कसा? असा सवाल
केला होता.
याबाबत जालिंदर कामठे यांनी पक्षाची भुमिका स्पष्ट करीत, बांदल यांना वारंवार सांगूनही त्यांनी पक्षविरोधी कारवाया थांबविल्या नाहीत. त्यामुळे त्यांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्यामुळे ते किंवा त्यांच्या पत्नी रेखा बांदल यांना तिकीट देण्याचा प्रश्नच येत नाही, असे ‘लोकमत’शी बोलताना स्पष्ट केले. ही पक्षाची अधिकृत भूमिका असल्याचेही त्यांनी सांगितले.
याबाबत बांदल यांना विचारले असता, मला पक्षाने आजपर्यंत कुठलेही पत्र दिले नाही.
पक्षाचा सक्रिय सभासद करून घेतले आहे. मी फक्त अजित पवार यांना मानतो. ते सांगतील तेव्हा मी ठरवेन. तोपर्यंत मी त्यांचा कार्यकर्ता आहे. ते म्हणाले, की कामठे यांनी मला फक्त पत्र देऊन दाखवावे.
तसेच सुरेश घुले यांच्याबाबत बोलताना शरद पवार साहेबांच्या गाडीवर लाथा मारणाऱ्यांनी मला पक्षनिष्ठा किंवा नैतिकता शिकवू
नये. त्यांनी पैैसे घेऊन कोणाची वकिलीही करू नये. माझ्यासमोर येऊन चर्चा करावी, असे आवाहन बांदल यांनी केले़