रांजणगावच्या पोलीस निरीक्षकपदी मांडगे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:15 IST2021-08-25T04:15:36+5:302021-08-25T04:15:36+5:30
१९९५ मध्ये राज्याच्या पोलीस विभागात मांडगे यांनी वरळी, मुंबई येथून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी आजपर्यंत मुंबई शहर, पुणे ...

रांजणगावच्या पोलीस निरीक्षकपदी मांडगे
१९९५ मध्ये राज्याच्या पोलीस विभागात मांडगे यांनी वरळी, मुंबई येथून आपल्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यांनी आजपर्यंत मुंबई शहर, पुणे ग्रामीण, सातारा, यवतमाळ आणि पुणे शहर येथे नियंत्रण विभागात काम केलेले आहे. ज्येष्ठ नागरिक, महिला व कामगार यांच्या सुरक्षिततेकडे विशेष लक्ष देणार असून, ग्रामसुरक्षा दलाच्या मदतीने गाव व रांजणगाव एमआयडीसीमधील भुरट्या चोऱ्यांना प्रतिबंध करण्यात येणार असून, पोलिसांचे मनोदय उंचावण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे पोलीस निरीक्षक मांडगे यांनी पदभार स्वीकारल्यानंतर सांगितले.
--
फोटो क्रमांक : २४ रांजणगाव गणपती पोलीस
फोटो: रांजणगाव एमआयडीसी येथे मावळते पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांच्याकडून पोलीस निरीक्षक पदाचा बलवंत मांडगे यांनी कार्यभार स्वीकारला.
240821\img-20210824-wa0129.jpg
रांजणगाव एमआयडीसी पोलीस स्टेशनचा पदभार स्वीकारताना बलवंत मांडगे