मंडईला गतवैभव मिळवून देणार

By admin | Published: October 2, 2014 12:06 AM2014-10-02T00:06:51+5:302014-10-02T00:06:51+5:30

महात्मा फुले मंडईला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याचे वचन राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक मानकर यांनी पदयात्रे वेळी नागरिक व गाळेधारकांना बुधवारी दिले.

The mandai will get the good fortune | मंडईला गतवैभव मिळवून देणार

मंडईला गतवैभव मिळवून देणार

Next
पुणो : ऐतिहासिक महत्त्व असलेल्या व एके काळी पुणो शहराचे प्रमुख व्यापार केंद्र म्हणून ओळखल्या जाणा:या महात्मा फुले मंडईला पुन्हा गतवैभव प्राप्त करून देण्याचे वचन राष्ट्रवादीचे उमेदवार दीपक मानकर यांनी पदयात्रे वेळी नागरिक व गाळेधारकांना बुधवारी दिले.
कसबा पेठ विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार दीपक मानकर यांच्या पदयात्रेला श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरापासून बुधवारी सुरुवात झाली. त्यानंतर बाबू गेनू मंडळ, मंडई गणपती, टिळक पुतळा, लंकेवाडा, ¨शदेआळी, बदामी हौद चौकमार्गे पदयात्रेचा मंडई गणपती येथे समारोप करण्यात आला.
‘‘मंडई एके काळी पुण्याच्या आर्थिक व्यवस्थेचे प्रमुख व्यापारी केंद्र म्हणून प्रसिद्ध होते. बहुजन समाजाचे प्रतिनिधित्व करणा:या मंडईची आजमितीस अत्यंत दुरवस्था झाली आहे. 
किमान 8क् टक्के गाळेधारक हे आपले मंडईमधील  हक्काचे गाळे सोडून रस्त्यावर ठाण मांडून बसतात. मग त्यांच्यावर महापालिकेचा अतिक्रमण विभाग कारवाई करतो. हे चित्र बदलण्यासाठी महात्मा फुले मंडईचे मार्केट यार्ड येथील शिवाजी मार्केट यार्डाच्या धर्तीवर  नूतनीकरण करण्यात येईल,’’ असे  मानकर यांनी सांगितले. ज्येष्ठ नागरिक दिनानिमित्त दीपक मानकर यांनी ज्येष्ठ गाळेधारक सरस्वती भोकसे व शिवाजी काची यांच्याशी संवाद साधला. त्या वेळी ज्येष्ठ गाळेधारकांनी मानकर यांना समस्यांविषयी निवेदन दिले.
उमेदवार दीपक मानकर यांना तीन अपक्ष उमेदवारांनी बिनशर्त पाठिंबा देत उमेदवारी अर्ज बुधवारी मागे घेतला. त्यामध्ये रूपा भोकरे, इम्रान अन्वर शेख व फौजिया रोकडे यांचा समावेश आहे, असे मानकर यांनी सांगितले.  (प्रतिनिधी)
 
1मंडईतील प्रश्नांचे निवेदन गाळेधारकांनी दीपक मानकर यांना दिले. त्यानंतर मानकर म्हणाले, ‘‘मंडई व तुळशीबाग  येथे महिला मोठय़ा संख्येने खरेदीसाठी गर्दी करतात. त्याच्यासाठी पुरेशी सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारणो गरजेचे आहे. सुरक्षेसाठी सीसी टीव्ही लावण्यावर माझा भर राहील.  
2 सर्व गाळेधारकांना आवश्यक मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिल्यास रस्त्यावर बसणा:या व्यावसायिकांचे प्रमाण आपोआप कमी होईल. त्यामुळे वाहतूककोंडीचा प्रश्न सुटेल. सामान्य नागरिकांचा, विशेषत: ज्येष्ठ नागरिकांचा या रस्त्यावरील वावर सुसह्य होईल. महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न सुटेल.

 

Web Title: The mandai will get the good fortune

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.