मंचरला एकाला मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 14, 2021 04:12 IST2021-03-14T04:12:10+5:302021-03-14T04:12:10+5:30

याप्रकरणी आश्रम नवाब शेख, आलम नवाब शेख, शहबाज नवाब शेख (सर्व रा. कोंढवा) यांच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात ...

Mancharla beat one | मंचरला एकाला मारहाण

मंचरला एकाला मारहाण

याप्रकरणी आश्रम नवाब शेख, आलम नवाब शेख, शहबाज नवाब शेख (सर्व रा. कोंढवा) यांच्या विरोधात मंचर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुनिषरजा मुनीर शेख यांनी मंचर पोलिसात फिर्याद दिली आहे. मंचर गावच्या हद्दीत काजीपुरा येथे शेख यांच्या घरात आश्रम नवाब शेख, आलम नवाब शेख, शहबाज नवाब शेख हे अनधिकृतपणे घरात आले. तू तुझ्या आईला भाड्याचे मिळालेले पैसे का देत नाही. असे म्हणून त्यांनी मुनिषरजा मुनीर शेख यांना जीवे मारण्याची धमकी दिली. शेख हे तक्रार देण्यास जात असल्याने आरोपींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच गोळ्या घालून ठार मारण्याची धमकी दिली. शेख यांना सोडविण्यासाठी आलेले त्यांची पत्नी, मुलगा व भाऊ यांनाही धक्काबुक्की करण्यात आली. मुनीशरजा शेख यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पोलिसांनी आश्रम नवाब शेख,आलम नवाब शेख, शहबाज नवाब शेख यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस राजेंद्र हिले करत आहे.

Web Title: Mancharla beat one