मंचरला अवैध धंद्यांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 22, 2020 04:11 IST2020-12-22T04:11:29+5:302020-12-22T04:11:29+5:30

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास वडगाव काशिंबेगच्या हद्दीत मंचर घोडेगाव रस्त्यावर असणाऱ्या वाळुंजवाडी फाट्यावर विश्वास दगडू ...

Manchar to take action on illegal trades | मंचरला अवैध धंद्यांवर कारवाई

मंचरला अवैध धंद्यांवर कारवाई

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रविवारी रात्री ८.३० च्या सुमारास वडगाव काशिंबेगच्या हद्दीत मंचर घोडेगाव रस्त्यावर असणाऱ्या वाळुंजवाडी फाट्यावर विश्वास दगडू शेळके (वय ३८, रा.वाळुंजवाडी) हा दारू विक्री करताना आढळला. त्याच्याकडून २ हजार ४९६ रुपयांची दारू व मोटार जप्त केली आहे. याबाबत पोलीस कर्मचारी पुंडलिक हरिभाऊ मराडे यांनी फिर्याद दिली. दुसऱ्या घटनेत धामणी फाटा येथे असणाऱ्या जय मल्हार हॉटेलच्या पाठीमागच्या बाजूस राहुल सुभाष जाधव (वय ३३, रा. धामणी ता. आंबेगाव) हा अवैध दारू विक्रीचा व्यवसाय करत असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी त्या ठिकाणी छापा मारून ५७२ रुपये किमतीची दारू जप्त केली आहे. याबाबत बीट जमादार तानाजी आगवणे यांनी फिर्याद दिली आहे. तर अवसरी बुद्रुक येथील पहाडदरा रस्त्यालगत असणार्‍या एकांत व्हॅली हॉटेल च्या बाजुला मनोज शरद चव्हाण (वय ३४ रा.अवसरी बुद्रुक ता.आंबेगाव ) हा दारु विक्री करत असताना त्याच्याकडून ९४४ रुपयाची अवैध दारू जप्त केली आहे.

Web Title: Manchar to take action on illegal trades