ताडी विक्रेत्यावर मंचर पोलिसांचा छापा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2021 04:07 IST2021-03-30T04:07:04+5:302021-03-30T04:07:04+5:30
याप्रकरणी पोलीस नाईक तुकाराम मोरे यांनी फिर्याद दिली आहे.मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर ...

ताडी विक्रेत्यावर मंचर पोलिसांचा छापा
याप्रकरणी पोलीस नाईक तुकाराम मोरे यांनी फिर्याद दिली आहे.मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : मंचर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधाकर कोरे यांना लोणी परिसरात बेकायदेशीररित्या ताडी विक्री सुरू असल्याची माहिती मिळाली होती.त्यांनी पोलिसांना कारवाई करण्याची सूचना केली.त्यानुसार सायंकाळी साडेसातच्या सुमारास लोणी येथील एका हॉस्पिटलच्या बाजूला असणाऱ्या सूर्यवंशी आळीतील खोली नंबर पाच च्या बाजूला घराच्या आडोशाला ताडी विक्री सुरू होती. महादेव बबन भागवत (वय ५४ रा. पारगाव ता. आंबेगाव) याने अठराशे रुपये किमतीचा बेकायदेशीर बिगर परवाना तयार ताडीचा साठा जवळ बाळगून त्याची विक्री करत असल्याचे आढळले. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. तपास पोलिस नाईक तानाजी हगवणे करत आहेत.