मंचर शहर विकास आघाडी अलिप्त राहण्याचा निर्णय : दत्ता गांजाळे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:03 IST2021-02-05T05:03:59+5:302021-02-05T05:03:59+5:30
मंचर ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यास धंदेपाणी,काळेकारनामे करता येणार नाही,म्हणून मंचर शहर विकास आघाडीच्या काही नेत्यांनी नगरपंचायतीस विरोध करून ग्रामपंचायत राहू ...

मंचर शहर विकास आघाडी अलिप्त राहण्याचा निर्णय : दत्ता गांजाळे
मंचर ग्रामपंचायतीची नगरपंचायत झाल्यास धंदेपाणी,काळेकारनामे करता येणार नाही,म्हणून मंचर शहर विकास आघाडीच्या काही नेत्यांनी नगरपंचायतीस विरोध करून ग्रामपंचायत राहू द्या, अशी भूमिका घेतली. त्यामुळे संबधितांच्या स्वार्थीवृत्तीला कंटाळून बाहेर पडत असल्याचे ते म्हणाले. मंचर येथे माजी सरपंच दत्ता गांजाळे यांनी मंचर शहर विकास आघाडीबाबत खदखद व्यक्त करण्यासाठी घेतलेल्या पत्रकार परिषदेला माजी उपसरपंच धनेश मोरडे, ग्रामपंचायत सदस्य अरुणनाना बाणखेले,ज्येष्ठ नागरिक संघाचे रंगनाथ थोरात,शिवप्रसाद राजगुरव,सुजित देशमुख,सुशांत जाधव उपस्थित होते.
यावेळी बोलताना गांजाळे म्हणाले की, शिवसेना पक्षात मी कायम आहे. ग्रामपंचायत ताब्यात असल्यास आपल्याला मनाप्रमाणे काही मिळकतीच्या नोंदी घालण्यासाठी व इतर अवैध गोष्टी करण्यासाठी काही स्वार्थी लोकांनी नगरपंचायतीला विरोध केला.
गांजाळे म्हणाले की, माझा सरपंच पदाचा कार्यकाळ संपल्यानंतर परवानगी नसताना बेकायदेशीर इमारती बांधल्या गेल्या.ग्रामपंचायतीच्या सरकारी जागेवर अतिक्रमण केले आहे..ग्रामपंचायत निवडणुकीत मी आघाडीच्या उमेदवारांसाठी मते मागण्यास गेलो होतो.त्यानुसार माझ्या विचाराचे सात ते आठ सदस्य निवडून आले आहेत.त्या सर्वांच्या समन्वयातून मंचर शहराचा विकास करण्यासाठी मी कटिबद्ध आहे. या टोळीतील काहीजण स्वतःला लोकनेते माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्यानंतर गावचे वारसदार समजतात. मात्र, बाणखेले यांच्या केसांची सर त्यांना येणार नाही, असा टोला गांजाळे यांनी लगावला. या पुढील काळात होणाऱ्या निवडणुकीत या टोळीला समवेत घेऊन महाविकास आघाडी निवडणूक लढविणार असेल तर त्यांच्यासोबत जाणार नाही, त्यावेळी सक्षम पर्याय उभा करू. असे गांजाळे यांनी सांगितले.