खडकीत तरुणाच्या डोक्यात वार करून खून करणाऱ्यास अटक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 8, 2021 04:16 IST2021-09-08T04:16:34+5:302021-09-08T04:16:34+5:30

पुणे : स्वयंपाक करण्यावरून झालेल्या भांडणात तरुणाने अल्पवयीन मुलाला चाकू लावल्याने दुसऱ्याने खिळे असलेली लाकडी फळी डोक्यात मारली. त्यात ...

Man arrested for stabbing youth in rock | खडकीत तरुणाच्या डोक्यात वार करून खून करणाऱ्यास अटक

खडकीत तरुणाच्या डोक्यात वार करून खून करणाऱ्यास अटक

पुणे : स्वयंपाक करण्यावरून झालेल्या भांडणात तरुणाने अल्पवयीन मुलाला चाकू लावल्याने दुसऱ्याने खिळे असलेली लाकडी फळी डोक्यात मारली. त्यात तरुणाचा मृत्यू झाला. याप्रकरणी खडकी पोलिसांनी एकाला अटक केली असून अल्पवयीन मुलाला ताब्यात घेतले आहे.

रमजान सय्यद (वय ३५, रा. खडकी रेल्वे स्टेशन फुटपाथ) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. तर संतोषकुमार साहा (वय ४०, रा. रेल्वे स्टेशन फुटपाथ, खडकी) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

याप्रकरणी पोलीस हवालदार अनिल रामदास शेलार यांनी फिर्याद दिली आहे. खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी सांगितले की, रमजान सय्यद, संतोषकुमार साहा व अल्पवयीन मुलगा हे तिघेही फुटपाथवर राहतात. संतोषकुमार हा मूळचा नेपाळचा राहणारा असून गेल्या ४-५ वर्षांपासून येथे राहताे. त्याने येथील एका तरुणीशी लग्न केले आहे. १ सप्टेंबरच्या रात्री स्वयंपाक करण्यावरुन त्यांच्यात भांडणे झाली. त्यात रमजान याने चाकू काढून अल्पवयीन मुलाला लावला. ते पाहून चिडलेल्या संतोषकुमार याने तेथे पडलेल्या खिळे असलेली लाकडी फळी उचलून रमजानच्या डोक्यात तसेच तोंडावर मारली. खिळा डोक्यात घुसल्याने रक्तस्राव होऊन त्यात रमजानचा मृत्यू झाला. दुस-या दिवशी सकाळी हा प्रकार उघडकीस आला. पोलिसांनी संतोषकुमार साहा याला अटक केली आहे.

Web Title: Man arrested for stabbing youth in rock