मलठणला दारूभट्टी उद्ध्वस्त, ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, तिघा विरोधात गुन्हा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:13 IST2021-06-09T04:13:41+5:302021-06-09T04:13:41+5:30
नीलेश जगन्नाथ लोंढे (रा. ज्योतिबानगर, हिंगणीबेर्डी), रमेश भिवाजी शेंडगे, गणेश मारुती शेंडगे (दोघेही राहणार मलठण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची ...

मलठणला दारूभट्टी उद्ध्वस्त, ८६ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, तिघा विरोधात गुन्हा
नीलेश जगन्नाथ लोंढे (रा. ज्योतिबानगर, हिंगणीबेर्डी), रमेश भिवाजी शेंडगे, गणेश मारुती शेंडगे (दोघेही राहणार मलठण) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
मलठण गावच्या हद्दीतील चव्हाणवस्ती परिसरात गावठी दारूचीभट्टी लावली जात असल्याची माहिती दौंड पोलिसांना मिळताच पोलिसांनी त्या दारूभट्टी अड्ड्यावर धाड टाकली. पोलिसांची चाहूल लागताच सर्व आरोपी फरार झाले. या वेळी पोलिसांनी त्या ठिकाणाहून गावठी दारू (हातभट्टी) बनवण्यासाठी लागणारे मोठ्या प्रमाणावरील कच्चे रसायन, पत्र्याची टाकी, दोन इलेक्ट्रिक मोटार असा जवळपास ८६ हजाराचा मुद्देमाल जप्त केला. आरोपी या ठिकाणी भट्टी लावून गावठी दारू तयार करत होते. फरारी आरोपी विरोधात पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक शिंदे करीत आहेत.
अवैध दारूविक्री जोरात..
गेली वर्षभर कोरोनाकाळ चालू असला तरीही दौंड तालुक्याच्या पूर्व भागातील काही गावांत अवैध दारूविक्री जोरात चालू आहे. इंग्लिश दारुच्या नावाखाली लाॅकडाऊनमध्ये मोठ्या प्रमाणावर बोगस दारू विक्रीही करण्यात आल्याचे नागरिक बोलत आहेत.